Delhi Horror: 4 KM फरफटत नेलं, नग्नावस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

Delhi Horror Case: राजधानी दिल्लीत एक अत्यंत भीषण घटना घडली ज्यामध्ये एका कारने 23 तरुणीला तब्बल 4 किमी फरफटत नेलं. ज्यामध्ये तरुणीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला.
दिल्लीत तरुणीचा हृदयद्रावक मृत्यू
दिल्लीत तरुणीचा हृदयद्रावक मृत्यू

Delhi Horror Case Update: नवी दिल्ली: दिल्लीच्या (Delhi) सुलतानपुरीतील कांझावाला भागात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये धुंद असलेल्या तरुणांनी तरुणीच्या स्कूटीला धडक (Accident) दिली. बेदरकारपणे आपली कार चालवणारे हे तरुण फक्त धडक देऊनच थांबले नाही तर त्यांनी तरुणीला सुमारे चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. बेधुंद तरुणांची कार पुढे जात होती आणि तरुणी रस्त्यावरुन फरफटत राहिली. आधी तिचे कपडे फाटले, नंतर त्वचा सोलवटून निघाली आणि शेवटी तिचा मृत्यू (Death) झाला. (car kept running for 4 KM torn clothes and girl dead body on the road know full story of delhi horror)

एकीकडे देशात नववर्षाच्या जल्लोष सुरु होता. तर त्याचवेळी राजधानी दिल्लीच्या रस्त्यावर एक मुलगी निपचीत अवस्थेत पडली होती. ते देखील नग्नाववस्थेत. देशाची राजधानी दिल्लीच्या रस्त्यावर एका मुलीला 5 श्रीमंतांच्या धेडांनी आपल्या कारने फरफटत नेऊन ठार केलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी पाच तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

बलात्कार झाला नसल्याचा पोलिसांचा दावा

अपघात झाल्याचं जेव्हा समजलं तोपर्यंत तरुणीच्या अंगावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. रस्त्यावरुन फरफटत गेल्याने तिचं संपूर्ण शरीर सोलून निघालं होतं. ज्यामध्ये तिचा अत्यंत भयंकर पद्धतीने मृत्यू झाला. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराची बाब चुकीची असल्याचं म्हटलं आहे. मात्र, आरोपींची चौकशी करून संपूर्ण घटनेबाबत उलगडा करण्यात येणार आहे.

दिल्लीचे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कांझावाला भागात पोलिसांना एक पीसीआर कॉल आला की, एक मुलगी रस्त्याच्या कडेला विवस्त्र अवस्थेत पडली आहे. जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला तेव्हा त्यांना समजलं की, एक 23 वर्षीय तरुणी ही आपल्या स्कूटीवरून तिच्या घरी परतत होती.

दिल्लीत तरुणीचा हृदयद्रावक मृत्यू
खड्डा, वेग, डुलकी... ऋषभ पंतचा अपघात कशामुळे? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

डीसीपी पुढे म्हणाले, 'एका बलेनो कारमध्ये पाच तरुण प्रवास करत होते, याच कारने तरुणीच्या स्कूटीला धडक दिली आणि हीच कारने मुलीला सुलतानपुरी ते कांझावाला म्हणजेच सुमारे 4 किलोमीटर फरफटत घेऊन गेली. ज्यामध्ये मुलीचे सर्व कपडे फाटले. तिच्या शरीरावर खूप जखमा झाल्या ज्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कोण आहेत आरोपी?

मुलीच्या एवढ्या निर्दयीपणे झालेल्या मृत्यूला पाच तरुण कारणीभूत आहे. हे पाचही तरुण दिल्लीतीलच आहेत. त्यापैकी काही हेअर ड्रेसर आहेत तर काही रेशनचे व्यापारी आहेत. पोलिसांनी कारमधील पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी 26 वर्षीय दीपक खन्ना यांचा मुलगा राजेश खन्ना हा ग्रामीण सेवेत चालक पदावर आहे. याशिवाय अमित खन्ना (वय 25 वर्ष) हा उत्तम नगरमध्ये एसबीआय कार्डसाठी काम करतो.

दिल्लीत तरुणीचा हृदयद्रावक मृत्यू
BJP आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात, गाडी पुलावरुन 30 फूट खाली कोसळली

मृत तरुणीच्या कुटुंबीयांचा आक्रोश

मृत तरुणीचे कुटुंबीय अमन विहार येथील रहिवासी आहेत. तिच्या घरी आई आणि चार बहिणी आहेत. तर दोन लहान भाऊही आहेत, ज्यांचे वय 9 वर्षे आणि 13 वर्षे आहे. वडिलांचे आधीच निधन झाले आहे. तर एका बहिणीचे लग्न झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीच्या आईने या घटनेबाबत फक्त डीसीपींशी बातचीत केली आहे.

या हृदयद्रावक घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना समन्स बजावले आहे. खरं तर असे समन्स बजावले जातील, आयोग तयार केले जातील. पण दिल्लीत मुलींनी सुरक्षित रहावं यासाठी सरकार नेमकं काय करणार असा सवाल आता विचारला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in