मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल, टाटा कॅन्सर रुग्णालयातील नातेवाईकांसाठी बॉम्बे डाईंग परिसरात नवीन खोल्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उपक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिल्यामुळे महाविकास आघाडीत नवीन वाद निर्माण झाला होता. परंतू अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी डॅमेज कंट्रोल केलं आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईंकांसाठी आता बॉम्बे डाईंग परिसरात नवीन खोल्या उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण? गृहनिर्माण […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उपक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिल्यामुळे महाविकास आघाडीत नवीन वाद निर्माण झाला होता. परंतू अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी डॅमेज कंट्रोल केलं आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईंकांसाठी आता बॉम्बे डाईंग परिसरात नवीन खोल्या उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांसाठी १०० सदनिका देण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. टाटा कॅन्सर रुग्णालय सदनिका हे जितेंद्र आव्हाडांचं ड्रीम प्रोजेक्ट मानलं जातं होतं. खुद्द शरद पवार यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं होतं. शरद पवारांनी या सदनिकांच्या चाव्या टाटा कॅन्सर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बडवे यांना सुपूर्द केल्या होत्या.
परंतू शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी या प्रकल्पाबद्दल तक्रार केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली. या बाबतचा अहवाल तपासून सादर करण्यात यावा असा शेराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत आणखी एक वाद निर्माण होतोय अस चित्र तयार झालं होतं.
परंतू मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात अवघ्या २४ तासांत तोडगा काढून बॉम्बे डाईंग परिसरातल्या १०० सदनिका देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान महाविकास आघाडीत विसंवाद असता तर २४ तासांच्या आत निर्णय झाला नसता. आधीच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतरही त्याच परिसरात या प्रकल्पासाठी १०० सदनिका देऊ शकलो याचा मला आनंद असल्याची भावना जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली.