ना राहुल ना सोनिया, काँग्रेसला मिळणार गैर गांधी अध्यक्ष?, ही नावं चर्चेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

20 ऑगस्टपर्यंत काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत, जे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करतील आणि त्यानंतर प्राधिकरण अधिसूचित करेल.

येत्या 4 ते 5 दिवसांत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र राहुल गांधी हे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास तयार नसले तरी त्यांचे मन वळविण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. खरं तर राहुल गांधी गैर गांधी नेत्याला अध्यक्षपद देण्यावर ठाम आहेत आणि त्यामुळेच ते प्रियांका गांधींना उमेदवारी देण्यास नकार देत आहेत.

राहुल राजी नाहीत, सोनिया गांधीही तयार नाहीत!

राहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास तयार नसतील तर पक्षातील एक मोठा वर्ग सोनिया गांधींना 2024 पर्यंत या पदावर कायम ठेवण्याची मागणी करत आहे. त्याचवेळी, प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधी या पदावर राहू इच्छित नाहीत. राहुल गांधींनाही सोनियांच्या जागी गैर-गांधींनी पदभार स्वीकारावा अशी इच्छा आहे. मात्र, 4 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या महागाई-बेरोजगारीवरील हल्ला बोल रॅलीत राहुल सहभागी होणार आहेत. त्यानंतर 7 सप्टेंबरपासून 148 दिवस कन्याकुमारी ते काश्मीर या 3500 किलोमीटरच्या प्रवासातही ते सहभागी होणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गेहलोत, खर्गे, वेणुगोपाल आणि वासनिक यांचीही नावं चर्चेत

अध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेससाठी अवघड ठरत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, कुमारी सेलजा आणि मुकुल वासनिक यांसारख्या नेत्यांमध्ये एका नावावर एकमत होण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे शेवटपर्यंत सहमत नसतील तरच. एकंदरीत, गांधी परिवार आणि काँग्रेस अध्यक्षांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, ज्याची आजपासून सुरुवात झाली आहे असं म्हणायला हारकत नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT