मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच मास्कविना साजरा झाला सोहळा
महाराष्ट्रात कोरोना खूप वेगानं पसरतोय. त्याला रोखण्यासाठी सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक केलेत. काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही लावलाय. पुण्यातही मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातोय. पण आज शिवनेरी किल्ल्यावर कोरोना नियमांचं उल्लंघन होताना दिसलं. शिवजयंतीनिमित्त आज शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा झाला. कोरोनाकाळात […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोना खूप वेगानं पसरतोय. त्याला रोखण्यासाठी सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक केलेत. काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही लावलाय. पुण्यातही मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातोय. पण आज शिवनेरी किल्ल्यावर कोरोना नियमांचं उल्लंघन होताना दिसलं.
शिवजयंतीनिमित्त आज शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा झाला. कोरोनाकाळात पहिल्यांदाच शिवजयंतीचा सोहळा साजरा होतोय. त्यामुळे सरकारनं शिवजयंती साजरी करण्यासाठी काही नियम जारी केले होते.
मात्र या नियमांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीनंच पायमल्ली झाल्याचं शिवनेरीवर बघायला मिळालं. लोक एकमेकांना खेटून, मास्कविना गर्दी केल्याचं दिसलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मास्क घातलेला होता.
शिवजन्म सोहळा! pic.twitter.com/Kz8lhr0rCR
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 19, 2021
राज्य सरकारच्या सूचनेनुसार, पुणे जिल्हा प्रशासनाने शिवनेरी येथील शिवजयंती महोत्सव साध्या पद्धतीनेच साजरा करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. या कार्यक्रमास १०० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.