ड्रग्स केसमध्ये आर्यन खान अटकेत, शाहरुखला आधार देण्यासाठी सलमान गेला ‘मन्नत’वर
मुंबई: ड्रग्स प्रकरणात अटक झालेला आर्यन खानला कालची संपूर्ण रात्र एनसीबीच्या कस्टडीत काढावी लागली आहे. दुसरीकडे अभिनेता शाहरुख खान हा देखील आपल्या मुलाच्या अटकेप्रकरणी सतत अपडेट घेत आहे. या कठीण काळात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा शाहरुखला भेटण्यासाठी थेट त्याच्या घरी गेला होता. काल (3 ऑक्टोबर) उशिरा सलमान हा शाहरुखच्या मन्नत या बंगल्या गेला होता. […]
ADVERTISEMENT

मुंबई: ड्रग्स प्रकरणात अटक झालेला आर्यन खानला कालची संपूर्ण रात्र एनसीबीच्या कस्टडीत काढावी लागली आहे. दुसरीकडे अभिनेता शाहरुख खान हा देखील आपल्या मुलाच्या अटकेप्रकरणी सतत अपडेट घेत आहे. या कठीण काळात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा शाहरुखला भेटण्यासाठी थेट त्याच्या घरी गेला होता. काल (3 ऑक्टोबर) उशिरा सलमान हा शाहरुखच्या मन्नत या बंगल्या गेला होता. आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख आणि गौरी हे पूर्णपणे खचून गेल्याने त्यांना धीर देण्यासाठी सलमान तिथे गेला असल्याचं बोललं जात आहे.
जेव्हा सलमान खान हा शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या मन्नत बंगल्याजवळ गेला तेव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला मात्र सलमान काहीही न बोलता थेट बंगल्यात शिरला. रात्री उशिरा झालेल्या या भेटीत नेमकं काय बोलणं हे मात्र समजू शकलेलं नाही.
शाहरुख खानचं कुटुंब हे प्रचंड तणावाखाली असल्याने सलमान आपल्या मित्राला आधार देण्यासाठी गेला असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर देखील याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. परंतु दोघांपैकी कोणत्याही कलाकाराने या भेटीबाबत अधिकृत निवेदन दिलेले नाही.