पालिका शाळांची प्रतिमा बदलण्याचा BMC चा प्रयत्न
मुंबई तक: मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अहवालामध्ये मुंबई माहापालिकेच्या शाळांबद्दल लोकांचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यामध्ये 10 नवीन सीबीएसई शाळांना परवानगी देण्याबरोबरच पालिका शाळांमध्ये बाल हक्क संरक्षण समिती स्थापन करणे याबाबत जाहीर करण्यात आले आहे. शिक्षण समितीचे उपायुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्या उपस्थितीत शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर केला. […]
ADVERTISEMENT

मुंबई तक: मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अहवालामध्ये मुंबई माहापालिकेच्या शाळांबद्दल लोकांचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यामध्ये 10 नवीन सीबीएसई शाळांना परवानगी देण्याबरोबरच पालिका शाळांमध्ये बाल हक्क संरक्षण समिती स्थापन करणे याबाबत जाहीर करण्यात आले आहे.
शिक्षण समितीचे उपायुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्या उपस्थितीत शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये 2701.77 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प होता. ज्यामध्ये पालिका शाळांची ओळख बदलण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले आहेत. मुंबई महापालिका शाळांचे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ (MPS) असे नाव दिले आहे.
तसेच पालिकेच्या बोधचिन्हासह या नावाचा उल्लेख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिकेने 2020-2021 ला सुरू केलेल्या सीबीएसई शाळांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने 10 नवीन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये शहर विभागात 2, पश्चिम उपनगरात 3, पूर्व उपनगरांमध्ये 5 शाळा असतील. तसंच या शाळांची प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी 2021 पासूनच सुरू करण्यात येणार आहे.