उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत : कोश्यारींना हटविण्यावर फडणवीसांचं विधान
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका जाहीर केली. येत्या ३ डिसेंबरला सकाळी ७ वाजता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे जाऊन आमची व्यथा मांडणार आहोत. तिथं आम्ही आमचा प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहोत, असं उदयनराजे यांनी सांगितलं. शिवाय, आपण या […]
ADVERTISEMENT

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका जाहीर केली. येत्या ३ डिसेंबरला सकाळी ७ वाजता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे जाऊन आमची व्यथा मांडणार आहोत. तिथं आम्ही आमचा प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहोत, असं उदयनराजे यांनी सांगितलं.
शिवाय, आपण या प्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचही उदयनराजे यांनी जाहीर केलं. तसंच राज्यपाल कोश्यारींवर कारवाई झाली नाही तर कमीत कमी शिवाजी महाराजांच तरी नावंही घेऊ नये असाही, आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. तसचं या सर्व प्रकरणामुळे आपण हतबल असल्याचंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान :
छत्रपती उदयनराजेंच्या याच भूमिकेवर आणि हतबलतेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं. पुण्यात बोलताना फडणवीस म्हणाले, छत्रपती उदयनराजे यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. छत्रपतींचे वंशज कधीही हतबल होऊ शकत नाहीत. त्यामुळे जरी ते भावनेतून बोलले असले तरी महाराष्ट्र आणि देश त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचलेल्या देखील आहेत.
शेवटी राज्यपाल हे संवैधानिक पद असतं. त्यांना नियुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींच्या हाती असतात. त्यामध्ये सरकार काहीही करु शकत नाहीत. महाराज ते देखील समजून घेतली. पण त्यांच्या भावनेच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहेत. शेवटी पुन्हा एकदा सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा प्रेरणास्त्रोत कोण असूच शकत नाही. आमच्या सर्वांचे देखील तेच प्रेरणास्त्रोत आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.