डोंबिवली: तीन तरुणांकडून 65 वर्षीय व्यक्तीचे अपहरण, अपहरणाचं नेमकं कारण काय?

डोंबिवली: तीन तरुणांकडून 65 वर्षीय व्यक्तीचे अपहरण, अपहरणाचं नेमकं कारण काय?
dombivli kidnapping of 65 year old man by three youths what is the exact reason for the abduction

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: नोकरी लावण्यासाठी दिलेले पैसे परत न केल्याने एका 65 वर्षीय व्यक्तीचं तीन तरुणांनी अपहरण केल्याची घटना डोंबिवलीच्या मानपाडा भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. मात्र, डोंबिवलीसारख्या सुस्कृंत शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालल्याने डोंबिवलीकरांची चिंता मात्र वाढली आहे.

नेमकी घटना काय?

डोंबिवलीत राहणारे शुभाशिष बॅनजी हे एक शिपींग एजंट आहेत. त्यांना मनजीत यादव नावाच्या शिपींग एजंटने तीन तरुणांना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख रुपये दिले होते. बॅनर्जी यांनी या तीनही तरुणांसाठी श्रीलंकेत काम शोधलं. त्यांचा व्हिसा देखील तयार केला. यासाठी मनजीत याने शुभाशिष बॅनजी यांना दिलेले पैसे खर्च झाले.

या तीन तरुणांची श्रीलंकेस जाण्यकरीता तारीख निश्चीत झाली. मात्र तिघांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने तिघांनाही क्वॉरंटाईन करण्यात आलं. हे तीनही तरुण 15 दिवस क्वारंटाईन असल्याने त्यांच्या व्हिसाची मुदत संपली.

यावेळी मनजीतने बॅनर्जी यांच्याकडे दिलेले पैसे परत करावे यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. बॅनर्जी यांनी यावेळी मनजीतला स्पष्ट सांगितले की, सर्व पैसे खर्च झाले. मात्र मनजीत काही थांबला नाही. त्याने धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव या दोन साथीदारांसह बॅनर्जी यांचे थेट अपहरण केले.

दरम्यान, अपहरणाची माहिती कळताच बॅनर्जी यांच्या पत्नीने थेट मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला.

या सगळ्यात मनजीत हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर पतीला जीवे ठार मारुन टाकण्याची धमकीही देत होता. इतकेच नाही तर अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले.

त्यानंतर बॅनर्जी यांनी ज्या अकाऊंटमध्ये पैसे जमा केले होते. त्याच माहितीच्या आधारे आणि काही तांत्रिक बाबीचा तपास करून मानपाडा पोलिसांनी थेट नालासोपारा येथील गोराई नाकाजवळील एका हॉटेलमध्ये छापा मारून बॅनर्जी यांची सुटका केली.

dombivli kidnapping of 65 year old man by three youths what is the exact reason for the abduction
नागपूर: दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या चिमुकल्याची हत्या? मृतदेह सापडला नदीच्या कॅनलमध्ये

यावेळी मनजीत यादव व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले असून आरोपी हे मूळचे उत्तरप्रदेश मधील राहणारे असल्याचे समजते आहे. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in