नशेत 8 वर्षांच्या बहिणीवर भावाकडून बलात्काराचा प्रयत्न, वडिलांनी केली मुलाची हत्या

आपल्याच 8 वर्षीय बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला स्वत: वडिलांनी गळा दाबून हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
drunk brother tries to rape 8 year old sister father strangles son to death up crime
drunk brother tries to rape 8 year old sister father strangles son to death up crime (प्रातिनिधिक फोटो)

बाराबंकी (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये (UP Barabanki) एका भावाने नशेच्या भरात आपल्याच 8 वर्षांच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृत्यानंतर त्याच्या वडिलांनी खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. पण तरीही वडिलांचं अजिबात ऐकून घेतल्याने रागाच्या भरात वडिलांनी आपल्या याच मुलाचा गळा दाबून हत्या (Murder) केली. या हत्येनंतर वडिलांनी मुलाचा मृतदेह जंगलात फेकून दिला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, देवा कोतवाली परिसरातील शिवराजचा मुलगा शुभम उर्फ ​​विकास यादव याची हत्या करून मृतदेह जंगलाजवळील एका नाल्यात फेकून दिला होता. खरं म्हणजे नाल्यातील चिखलात हा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी तरुणाच्या मानेवर व पाठीवर जखमेच्या खुणा आढळून आल्या.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्वान पथकासह तपास केला. घटनास्थळाचा आढावा घेत एसपींनी तपासासाठी दोन पोलिस पथके तयार केली होती. मृताच्या चुलत भावाच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बहिणींवरच होत वाईट नजर

पोलिस अधीक्षक अनुराग वत्स यांनी सांगितले की, मृताच्या वडिलांकडे चौकशी केली असता, मृत शुभमला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे निष्पन्न झाले. याच नशेत शुभम आपल्या बहिणींवर देखील वाईट नजर ठेवून होता. या कारणावरून घरात वारंवार भांडणे देखील होत होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मद्यधुंद अवस्थेत शुभमने आपल्या 8 वर्षीय बहिणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याचाच राग येऊन वडील शिवराज यांनी शुभमचा गळा आवळून त्याचा खून केला.

सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपासही सुरु आहे.

drunk brother tries to rape 8 year old sister father strangles son to death up crime
कल्याण: वासनांध प्रियकर-प्रेयसी, अल्पवयीन भाऊ-बहिणीवर प्रियकर-प्रेयसीकडून वारंवार बलात्कार

व्हिडीओ बघून अल्पवयीन भावाचा 3 वर्षाच्या सख्ख्या बहिणीवर बलात्कार

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका मुलाने आपल्या सख्ख्या 3 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही पीडित मुलीच्या आई-वडिलांनाही धक्का बसला.

या घटनेविषयी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी अशी माहिती दिली होती की, पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय विधीसंघर्षग्रस्त भावाने तीन वर्षाच्या सख्ख्या चिमुकल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला होता. अभ्यास करत असताना युट्युबवरील अश्लील व्हिडिओ पाहूनच हे अश्लील कृत्य केल्याची कबुली त्याने आपल्या आई-वडिलांना दिली होती. हा सर्व प्रकार ऑगस्ट महिन्यात घडलेला असून, आता तो समोर आला आहे.

आईवडिल कामावर गेल्यानंतर काय घडलं?

ऑगस्ट महिन्यात भाऊ बहीण (विधीसंघर्षग्रस्त मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी) घरी होते. आईवडिल कामावर गेल्यानंतर भावाने वडिलांच्या मोबाईलमध्ये युट्यूबवर अश्लील चित्रफित पाहिली. त्यानंतर घरात एकट्याच असलेल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारानंतर चिमुकलीला वेदना होऊ लागल्या. त्यामुळे आई-वडिलांनी तिला उपचाराकरिता पिंपरीतील एका रुग्णालयात दाखल केलं.

डॉक्टरांनी तपासणी करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन तिच्या आई-वडिलांनी या अत्याचाराबाबत विचारलं. त्यावर मोठ्या दादानेच हे कृत्य केल्याचं तिने आई-वडिलांना सांगितलं. या प्रकारानंतर पिंपरीतील सरकारी रुग्णालयाच्या मार्फत भोसरी पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळाली.

पोलीस पीडितेच्या घरी गेले असताना कुटुंबीयांनी तक्रार करण्यास नकार दिला होता. 'मुलगा आणि मुलगी दोन्ही आमच्याच रक्ताचे आहेत. आम्हाला कोणाविरुद्धही तक्रार द्यायची नाही', अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली. आईवडिलांनी नकार दिल्यानंतर पोलिसांनी या पालकांचे मन परिवर्तन करून त्यांना तक्रार देण्यासाठी तयार केले.

आता भोसरी पोलीस ठाण्यात युट्युबवरील अश्लील व्हिडिओ पाहून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विधी संघर्षग्रस्त 14 वर्षाच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in