अनिल देशमुखांना भारत सोडण्यास बंदी; ED ने काढली लूकआऊट नोटीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने झटका दिला आहे. देशमुख यांच्याविरुद्ध ईडीने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना आता देश सोडून जाता येणार नाही.

100 कोटी वसुली प्रकरणात सध्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी केली जात आहेत. या प्रकरणात ईडीकडून अनिल देशमुख वारंवार समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र, देशमुख देशमुख अद्यापही चौकशीसाठी हजर झालेले नाहीत.

दरम्यान, अनिल देशमुख चौकशीला कधी सामोरं जाणार, याकडे लक्ष लागलेलं असतानाच आता ईडीने अनिल देशमुखांविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ईडीचे आतापर्यंत पाच समन्स, पण…

ईडीकडून अनिल देशमुख यांना आतापर्यंत 5 वेळा समन्स बजावलेली आहेत. पहिलं समन्स 25 जून रोजी देण्यात आलं होतं. देशमुखांना 26 जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर लगेच 26 जून रोजी दुसरं समन्स पाठवण्यात आलं होतं. त्यांना 3 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यातं आलं होतं.

ADVERTISEMENT

त्यानंतर ईडीकडून तिसरं समन्स बजावण्यात आलं. 5 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथं समन्स 30 जुलै रोजी पाठवून 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. 18 ऑगस्टला पाचवं समन्स देण्यात आलं होतं. 16 ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना 18 ऑगस्टला हजर राहण्यास सांगितलं गेलं होतं. मात्र, त्यावेळीही देशमुख चौकशीसाठी गेले नाहीत.

ADVERTISEMENT

100 कोटी वसुलीचा आरोप ते मनी लाँड्रिंग…

सचिन वाझे प्रकरणानंतर परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खळबळजनक आरोप केले होते. बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं होतं, असं त्या पत्रात म्हटलेलं आहे.

घरं, कार्यालयांची झाडाझडती

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून अनिल देशमुख यांच्या घरं, कार्यालयांसह विविध मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे व स्वीय सचिव कुंदन शिंदे यांनाही अटक केलेली आहे. त्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचं ईडीने म्हटलेलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT