Exclusive : ठाकरेंआधी शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार; गोऱ्हेंना दिलं पत्र

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray :

मुंबई : विधान परिषदेत शिवसेनेचा (Shivsena) प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना पत्र दिलं आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव झाल्याचे या पत्रात सूचित करण्यात आलं आहे. गट नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी हे पत्र दिलं आहे. (Chief Minister Eknath Shinde has sent a letter to Deputy Speaker Neelam Gorhe to appoint Shiv Sena’s representative in the Legislative Council)

दरम्यान, या पत्राद्वारे विधानसभेपाठोपाठ आता एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरु केल्याची चर्चा आहे. प्रतोद नेमल्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय उद्धव ठाकरे गटातील विधान परिषदेतील आमदारांना या नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागणार आहे, अन्यथा कारवाईची टांगती तलवार कायम असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ठाकरेंच्या आधी शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार :

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून तयारी केली जात आहे. याबाबत आज (सोमवारी) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात खलबत झाली. त्यापूर्वीच आता शिंदेंकडून पक्ष प्रतोद नेमण्याचं पत्र देऊन ठाकरे गटावर पहिला वार करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

CM शिंदेंविरोधात ठाकरे अविश्वास प्रस्ताव आणणार; सरकार कोसळणार?

ADVERTISEMENT

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप करत देशद्रोही म्हटले होते. याच आरोपांवर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी ठाकरे गटातील आमदारांमध्ये बैठकीत चर्चा झाली. याबाबत उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेही ठाकरे गटाने नोटीस देण्याचे निवेदन दिले. विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबाळ जास्त असल्याने आता ठाकरेंच्या या खेळीने शिंदे अडचणीत येणार असल्याची चर्चा होती. आता शिंदेंनी टाकलेल्या डावाला ठाकरे कसं उत्तर देणार हे पहावं लागणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT