क्रूझ ड्रग्स: आर्यन खान प्रकरणात खंडणीचे पुरावे नाहीत, पुढील आदेशापर्यंत तपास स्थगित
मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण हे गेल्या काही दिवसात प्रचंड गाजलं होतं. कारण यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात खंडणीशी संबंधित कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत पुढील आदेश येईपर्यंत तपास थांबवण्यात आला आहे. अटकेनंतर शाहरुखकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करण्यात […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण हे गेल्या काही दिवसात प्रचंड गाजलं होतं. कारण यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात खंडणीशी संबंधित कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत पुढील आदेश येईपर्यंत तपास थांबवण्यात आला आहे.
अटकेनंतर शाहरुखकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करण्यात आला होता. याचाच तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष चौकशी पथक स्थापन करून सुमारे 20 जणांची चौकशी केली होती. मात्र, याबाबत अद्याप कोणताही पुरावा न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कारण खंडणीच्या प्रकरणात तक्रारदाराच्या एफआयआरच्या आधारे कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही.
खरं तर, एनसीबीचा स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल याने आरोप केला होता की, त्याने आर्यनच्या सुटकेसाठी शाहरुखकडून 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचं फोनवर ऐकलं होतं. प्रभाकरच्या या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते.
दुसरीकडे, क्रूझवर छापा टाकणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनच्या प्रमुखपदी असलेल्या समीर वानखेडे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार आहे. मात्र यावेळी त्यांनी कार्यकाळ वाढवण्याची मागणीही केलेली नाही. अंमली पदार्थांचे प्रकरण एनसीबी एसआयटीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे आणि आर्यन खानला या प्रकरणाच्या संदर्भात दर शुक्रवारी एनसीबी मुंबई कार्यालयात नियमित हजर राहण्याच्या अटीतूनही सूट देण्यात आली आहे.