Exclusive: गौतम अदाणी असे बनले देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, वाचा संपूर्ण मुलाखत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज चेंगप्पा, ग्रुप एडिटोरिअल डायरेक्टर (पब्लिशिंग), इंडिया टुडे ग्रुप

Gautam Adani Exclusive Interview: नवी दिल्ली: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि यशस्वी उद्योगपती गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी इंडिया टुडेला (India Today)एक दीर्घ आणि एक्स्क्लुझिव्ह अशी मुलाखत दिली आहे. यामध्ये गौतम अदाणी यांनी त्यांचा उद्योगपती होण्याचा प्रवास, भारताची आर्थिक स्थिती यासह अनेक विषयांवर सविस्तर मतं व्यक्त केली आहे. वाचा इंडिया टुडे ग्रुपचे ग्रुप एडिटोरिअल डायरेक्टर (पब्लिशिंग) राज चेंगप्पा (Raj Chengappa) यांनी घेतलेली गौतम अदाणींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत. (Gautam Adani the richest person in the country, has expressed his opinion in an exclusive interview with India Today)

नमस्कार, मी राज चेंगप्पा.. अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्या या खास मुलाखतीत आपलं स्वागत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गौतमजी, इंडिया टुडेसोबत बातचीत करण्यासाठी धन्यवाद.

अदाणी समूहाची (Adani Group) वाढ ही खरोखरच कौतुकास्पद आहे. तसेच तुम्ही विमान देखभाल, उत्पादन, दूरसंचार, डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिकसह इतर क्षेत्रांमध्येही झपाट्याने विविधता आणत आहात.

ADVERTISEMENT

पण 2022 मध्ये तुम्ही बरेच काही साध्य केले आहे. 150 अब्ज डॉलर्सच्या वैयक्तिक संपत्तीसह, तुम्ही रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि इतर दिग्गजांना देखील मागे टाकले आहे. तसंच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमानही आपण मिळवला आहात.

ADVERTISEMENT

व्यवसाय आणि वैयक्तिक संपत्ती या दोन्ही बाबतीत तुमचं अभूतपूर्व यश आणि तुमचा देशभरातील कोट्यवधी लोकांवर असलेला प्रभाव यासाठी गौतमजी मला तुम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, इंडिया टुडे मासिकाने तुम्हाला ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले आहे.

त्यासाठी तुमचे विशेष अभिनंदन.

प्रश्न 1: जेव्हा तुम्ही 2022 या सरत्या वर्षाकडे वळून पाहता, तेव्हा हे वर्ष तुमच्यासाठी किती खास ठरतं?

गौतम अदाणी: धन्यवाद, राज. 2022 हे साल एकापेक्षा अनेक अर्थांनी माझ्यासाठी खास वर्ष होतं. आमच्याकडे अदाणी विल्मरचा यशस्वी IPO होता आणि अशा प्रकारे, अदाणी विल्मर ही समूहाची सातवी सूचीबद्ध (listed) कंपनी बनली आहे. आम्ही एक बिझनेस मॉडेल तयार केले आहे. ज्याची सुरुवात आम्ही अगदी शून्यापासून, तो फायदेशीर बनवतो आणि नंतर सार्वजनिक करतो. हा आयपीओ याचेच एक उदाहरण होते. आम्ही जवळपास 10.5 अब्ज डॉलरमध्ये ACC आणि अंबुजा सिमेंट्स विकत घेतल्यावर आम्ही भारतातील दुसरे सर्वात मोठे सिमेंट उत्पादक बनलो आहोत. आम्ही आतापर्यंत केलेले हे सर्वात मोठे अधिग्रहण (Acquisition) आहे, आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील भारतातील आजवरचा सर्वात मोठा M&A व्यवहार आहे.

प्रश्न 2: सर्वात श्रीमंत भारतीय आणि सर्वात श्रीमंत आशियाई असण्याव्यतिरिक्त, तुम्ही जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील आहात. इतकं श्रीमंत होणं कसं वाटतं? तुमच्यासाठी पैशाचा नेमका अर्थ काय?

गौतम अदाणी: बघा, राजभाई, मला या रँकिंगचा आणि नंबरचा काही फरक पडत नाही. ते फक्त मीडिया हायप आहेत. मी पहिल्या पिढीतील उद्योजक आहे, ज्याला सारं काही शून्यातून निर्माण करायचं होतं. मला आव्हानांवर मात करण्यात मजा येते. आव्हान जेवढं मोठं असेल तेवढंच ही मीही खुश होतो. श्रीमंतांच्या क्रमवारीत किंवा मूल्यमापन यादीमध्ये असण्यापेक्षा लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची आणि राष्ट्राच्या विकासात आणि उभारणीत योगदान देण्याची संधी आणि क्षमता ही गोष्ट मला अधिक समाधान देणारी आणि महत्त्वाची बाब आहे. मी देवाचे आभार मानतो की, त्याने मला पायाभूत सुविधा उभारणीच्या माध्यमातून देशसेवा करण्याची उत्तम संधी दिली.

प्रश्न 3: तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाबद्दल भाष्य केलंत. तुम्हाला खरोखर कशामुळे आनंद होतो हे तुम्ही सांगू शकता?

गौतम अदाणी: व्यक्तिशः सांगायचे तर हे वर्ष ते माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचं वर्ष होते. याच वर्षी मी माझा 60वा वाढदिवस देखील साजरा केला. या वैयक्तिक मैलाच्या दगडाव्यतिरिक्त, या प्रसंगी माझ्या कुटुंबाने अदाणी फाउंडेशनला 60,000 कोटी रुपये देण्याचे वचन दिले आहे. या पैशांचा वापर तीन महत्त्वाच्या सामाजिक कारणांसाठी म्हणजेच, शिक्षण, आरोग्यसेवा आणि कौशल्य विकास यासाठी केला जाणार आहे. जे माझ्या अगदी जवळचे असे विषय आहे. तसंच जे कोणत्याही राष्ट्रासाठीही मूलभूत आहेत. या गोष्टीतून मला अपार समाधान आणि आनंद मिळाला आहे. असा आनंद हा कोणत्याही व्यावसायिक कामगिरीतून कधीच मिळणार नाही.

प्रश्न 4: तर गौतम भाई, चला याबाबत अधिक जाणून घेऊया. व्यवसायात किंवा जीवनात तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळते?

गौतम अदाणी: एक सामान्य माणूस म्हणून, भारतीयांचे धैर्य, सामर्थ्य, लवचिकता आणि दृढता माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आणि प्रेरक आहेत. आमच्या ग्रीन टॉक्स सीरीजमधील दुसऱ्या आवृत्तीत मला अरुणिमा सिन्हा आणि किरण कनोजिया या दोन असामान्य महिलांच्या कथांनी खूप प्रभावित केले. ज्यांनी दुर्दैवाने आपले काही अवयव गमावले पण तरीही त्यांनी अक्षरश: जग जिंकून दाखवलं. अरुणिमाने माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली आहे तर किरण ही ब्लेड रनर असून ती मॅरेथॉनमध्ये धावते. दोघीही अतुलनीय महिला आणि भारताची शान आहेत.

त्या खरोखरच नव्या भारताच्या खऱ्या हिरो आहेत. त्या दोघींच्याही खडतर प्रवासाने मला एवढं प्रभावित केलं की, अक्षरश: माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचं जे स्पिरिट आहे त्यासाठी मी खरोखरच विनम्र आहे. संकटांना तोंड देताना अशा प्रकारचं धाडस, शौर्य आणि जिद्द यापेक्षा प्रेरणादायी काय असू शकते? त्यांची कहाणी पाहून माझा विश्वास आणखी दृढ झाला की, माणसापेक्षा शक्तिशाली कोणतंही मशीन नाही. अशा मानवी कथा याच माझ्यासाठी सर्वात मोठा प्रेरणास्त्रोत आहेत.

प्रश्न 5: हे खरोखरच प्रेरणादायी आहे. आता मी व्यवसाय या विषयाकडे वळतो. मला जाणून घ्यायचंय की, तुमच्या समूहाच्या   विस्तारामागील नेमकं कारण काय आहे, मग ते पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्य असो किंवा नवीन क्षेत्रातील तुमचा प्रवेश असो?

गौतम अदाणी: माझा जन्म हा एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आणि मी 1970 आणि 80 च्या दशकात मी मोठा होत होतो, जेव्हा आम्हाला वीज, रस्ते आणि पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. हा तो काळ होता जेव्हा भारतातील बंदरे, विमानतळ आणि इतर भागात पायाभूत सुविधांची या गोष्टींची प्रचंड कमतरता होती. याउलट, भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या आणि 1990 च्या दशकात भारताच्या तुलनेत प्रति व्यक्ती कमी दरडोई उत्पन्न असलेल्या चीनने भारताला विकासात मागे टाकण्यास सुरुवात केली होती. या सर्व गोष्टींमुळे माझ्यात भारताचा कायापालट करण्याची, विशेषत: पायाभूत सुविधांमध्ये आणि भारताला मजबूत बनवण्यासाठी मी माझ्या परीने जे काही करू शकतो ते करण्याची अधिक तीव्र इच्छा निर्माण झाली.

दरम्यान, 1991 पासून, काही धोरणात्मक बदलांमुळे पायाभूत सुविधा क्षेत्रात खाजगी क्षेत्रानेही (Private Sector) सहभागी व्हावं यासाठी एक सक्षम वातावरण निर्माण केलं गेलं. हेच कारण आहे की, भारत आणि प्रत्येक भारतीयासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा निर्माण केल्या जाव्यात यासाठी प्रत्येक संधीचा वापर केला जावा असा माझा ठाम निर्धार असतो.

प्रश्न 6: गौतम भाई, तुमची व्यवस्थापन शैली काय आहे?, तुमच्या यशाचा नेमका मंत्र काय आहे?

गौतम अदाणी: आमचे सर्व व्यवसाय, उद्योग हे व्यावसायिक, सक्षम अशा सीईओमार्फत चालवले जातात. मी त्यांच्या दैनंदिन कामात ढवळाढवळ करत नाही. माझी भूमिका रणनीती ठरवणं, भांडवलाचं  वाटप करणं आणि त्यांच्या कामगिरीचा आढावा घेणं यापुरताच मर्यादित आहे.

त्यामुळेच माझ्याकडे एवढ्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण संस्थाचे व्यवस्थापन करण्याचा वेळ असतो. तसेच अनेक नवीन व्यवसायांच्या अधिग्रहणाच्या संधी शोधण्यासही वेळ मिळतो.

प्रश्न 7: तुम्ही नुकतेच NDTV मीडिया ग्रुप अधिग्रहीत केला आहे. इथे देखील तुमची तशीच भूमिका असेल का? जशी तुमची तुमच्या इतर व्यवसायाबाबत आहे, आणि दुसरे म्हणजे तुम्ही संपादकीय स्वातंत्र्य कसे सुनिश्चित कराल?

गौतम अदाणी: राज, संपादकीय स्वातंत्र्यावर, मला स्पष्टपणेच बोलायचे आहे की, एनडीटीव्ही हे एक विश्वासार्ह, स्वतंत्र, जागतिक नेटवर्क असेल ज्यामध्ये व्यवस्थापन आणि संपादकीय यांच्यात एक स्पष्ट लक्ष्मण रेखा असेल. मी जे बोलत आहे त्या प्रत्येक शब्दाबाबत तुम्ही अविरतपणे वादविवाद करू शकता आणि त्याचा अर्थ लावू शकता, जसे अनेकांनी केलेही आहे, परंतु आम्हाला जोखण्याआधी आम्हाला थोडा वेळही द्यावा.

प्रश्न 8: व्यवस्थापन आणि संपादकीय यांच्यामध्ये तुम्ही जी लक्ष्मण रेखा आखली आहे ती पाळली जाते की नाही हे आम्ही पाहू. पण याशिवाय आणखी एका मुद्द्याकडेही मी आपलं लक्ष वेधू इच्छितो, जो मुद्दा आपल्या टीकाकारांनीही उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, अदाणी समूह हे अत्यंत कर्जबाजारी आहे, त्यांच्यावर सुमारे 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तुम्हाला कितपत विश्वास आहे की, तुम्ही हे कर्ज  फेडू शकता?

गौतम अदाणी: हे पाहा राज, मला कबूल केले पाहिजे की, मी आमच्या कर्जाबद्दल जी चर्चा होते त्यामुळे मी आश्चर्यचकित आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आणि सुरक्षित आहोत. आमच्याबाबत जी चर्चा आहे ती दोन प्रकारच्या श्रेणीतून येते. पहिला श्रेणी त्यांची की, जे कंपनीचे कर्ज आणि वित्तविषयक बारीकसारीक बारकावे समजून घेण्यासाठी खोलात जाऊन जाणून घेत नाहीत. मला खात्री आहे की त्यांनी आर्थिक तपशील समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास कर्जाबद्दल त्यांचे असणारे सर्व गैरसमज दूर होतील. तर स्वार्थी हेतू असलेले दुसऱ्या श्रेणीतील लोक हे जाणीवपूर्वक आमच्या समूहाची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी संभ्रम आणि गैरसमज निर्माण करत आहेत.

याबाबतचे सत्य हे आहे की, गेल्या नऊ वर्षांत आमचा नफा आमच्या कर्जाच्या दुप्पट दराने वाढत आहे. ज्यामुळे आमचे कर्ज EBITDA प्रमाण 7.6 वरून 3.2 पर्यंत खाली आलेले आहे. जे एका मोठ्या समूहासाठी अतिशय आरोग्यदायी असेच आहे, जेथे बहुतेक कंपन्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आहेत.

हेच कारण आहे की केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींनीही आम्हाला भारताच्या सार्वभौम रेटिंगच्या बरोबरीने रेटिंग दिलं आहे. अदाणी समूहाएवढ्या सार्वभौम दर्जाच्या कंपन्या भारतातील अन्य कोणत्याही उद्योग समूहाकडे नाहीत. ही  माझ्यासाठी खरोखरच अभिमानाची बाब आहे.

हेच कारण आहे की केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींनीही आम्हाला भारताच्या सार्वभौम रेटिंगच्या बरोबरीने रेटिंग दिलं आहे. अदाणी समूहाएवढ्या सार्वभौम रेटिंग असलेल्या कंपन्या भारतातील अन्य कोणत्याही उद्योग समूहाकडे नाहीत. ही  माझ्यासाठी खरोखरच अभिमानाची बाब आहे.

राज, तुम्हाला तर माहितीच आहे की, रेटिंग एजन्सी, त्यातही विशेषत: आंतरराष्ट्रीय एजन्सी या रेटिंग देण्याच्या बाबतीत हातचं राखून आणि अतिशय कंजूस असतात. तसेच त्यांच्याकडे आर्थिक विश्लेषण करण्यासाठी एक अतिशय कठोर आणि मजबूत प्रणाली आणि प्रक्रिया देखील आहे.

आमच्या समूहाच्या या मूलभूत आर्थिक ताकदीमुळेच आम्ही केवळ तीन महिन्यांच्या विक्रमी वेळेत ACC आणि अंबुजासोबतचा 10.5 अब्ज डॉलरचा करार पूर्ण करू शकलो.

प्रश्न 9: मला याबाबत अधिक प्रश्न विचारायचे आहेत, कारण अशीही चिंता व्यक्त केली जात आहे की बँकांसह, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अदाणींच्या कर्जाबाबतीत मोठी जोखीम आहे. अशा प्रकारच्या मुद्द्यांना तुम्ही कसं उत्तर द्याल?

गौतम अदाणी: राज, हा एक चांगला प्रश्न आहे. वस्तुस्थितीची पडताळणी न करता लोक चिंता व्यक्त करतात. वस्तुस्थिती अशी आहे की, 9 वर्षांपूर्वी आपल्या एकूण कर्जापैकी 86 टक्के कर्ज हे भारतीय बँकांचे होते. पण आता भारतीय बँकांचे एकूण कर्जाचे प्रमाण केवळ 32% वर आले आहे. आमचे सुमारे 50% कर्ज हे आता आंतरराष्ट्रीय बाँडद्वारे आहेत. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार खूप हुशार आहेत आणि ते योग्य परिश्रम आणि सखोल अभ्यासनंतरच गुंतवणूक करतात. याची तुम्ही देखील प्रशंसा कराल.

प्रश्न 10: गौतम भाई, तुमचा जो आर्थिक विकास झालाय किंवा तुमची जी आर्थिक उलाढाल वाढली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे झाली आहे. असे म्हणणाऱ्या टीकाकारांना तुम्ही कसे उत्तर द्याल?

गौतम अदाणी: पंतप्रधान मोदी आणि मी एकाच राज्यातून येतो. त्यामुळे मी अशा बिनबुडाच्या आरोपांचे सोपे लक्ष्य बनतो.

जेव्हा मी माझ्या उद्योजकीय प्रवासाकडे मागे वळून पाहतो तेव्हा मी त्याचे विभाजन चार टप्प्यात करु शकतो. हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल की, हे सर्व राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सुरू झाले जेव्हा त्यांनी प्रथमच एक्झिम धोरणात उदारीकरण आणलं आणि अनेक वस्तू या पहिल्यांदाच ओजीएल सूचीमध्ये (OGL List) आणल्या गेल्या. यामुळे मला माझे एक्सपोर्ट हाऊस सुरू करण्यास मदत झाली. म्हणूनच, त्यावेळी राजीव गांधींशिवाय माझा उद्योजक म्हणून प्रवास कधीच सुरू झाला नसता.

मला दुसरा मोठी संधी ही 1991 मध्ये मिळाली, जेव्हा नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या जोडीने मोठ्या आर्थिक सुधारणांना सुरुवात केली. इतर अनेक उद्योजकांप्रमाणेच मीही त्या सुधारणांचा लाभार्थी होतो. त्याबद्दल अधिक विस्ताराने सांगण्यात अर्थ नाही कारण त्याबद्दल बरेच काही बोलले गेले आहे आणि लिहिले गेले आहे.

माझ्यासाठी तिसरा टर्निंग पॉइंट हा 1995 साली आला. जेव्हा केशुभाई पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तोपर्यंत, गुजरातमधील सर्व विकास  मुंबई ते दिल्ली NH 8च्या आसपास असणाऱ्या वापी, अंकलेश्वर, भरूच, सिल्वासा, वडोदरा, सुरत आणि अहमदाबाद या शहरांमध्येच केंद्रित होता. पण केशुभाई हे दूरदर्शी होते. त्यामुळे त्यांचा भर हा किनारपट्टीच्या विकासावर होता– आणि हे तेच धोरणात्मक बदल होते की, ज्यामुळे मी मुंद्रा येथे गेलो आणि तिथे माझे पहिले बंदर बनवण्याची प्रेरणा मिळाली.

चौथा टर्निंग पॉइंट हा 2001 साली आला, जेव्हा गुजरातने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रीत केले. नरेंद्र मोदी यांची धोरणे आणि त्यांच्या अंमलबजावणीमुळे केवळ राज्याची आर्थिक परिस्थितीच बदलली नाही तर सामाजिक परिवर्तन आणि पूर्वीच्या अविकसित भागांचा देखील विकास झाला. यामुळे उद्योग आणि रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढला. जो यापूर्वी कधीही वाढला नव्हता. आज, त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशाच प्रकारची कामगिरी करत असल्याचे आपण पाहत आहोत, जिथे आता एक नवा भारत प्रस्थापित होतोय.

पण हे दुर्दैवी आहे की, काही गोष्टी या माझ्या विरोधात थोपवल्या जातात. मी आधीच स्पष्ट केलं आहे की, मोदींवरुन जे हे आरोप निराधार आहेत आणि आमच्या समूहाचे यश पाहता ते पूर्वग्रह दूषित असेच आहेत. वस्तुस्थिती ही आहे की, माझे व्यावसायिक यश हे कोणा एका नेत्यामुळे नाही तर तीन दशकांहून अधिक काळातील अनेक नेत्यांनी आणि सरकारांनी अवलंबलेल्या धोरण आणि संस्थात्मक सुधारणांमुळे आहे.

प्रश्न 11: जर तुम्ही तुमच्या टर्निंग पॉइंट्सकडे पाहिले तर ते राजकीय स्पेक्ट्रममध्ये पसरलेले दिसून येते ना की, कोणत्याही एका विशिष्ट व्यक्ती किंवा पक्षाबाबत. पण तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आणि गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा त्यांचा प्रवास तुम्ही पाहिला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वशैलीबद्दल काय सांगाल?

गौतम अदाणी: पंतप्रधान मोदींनी भारताला दूरदर्शी आणि प्रेरणादायी नेतृत्व दिलेलं आहे. त्यांनी केवळ महत्त्वाचे धोरणात्मक बदलच केले नाहीत तर विविध कार्यक्रम आणि योजनांद्वारे प्रत्येक भारतीयाच्या जीवनावर थेट परिणाम केला आहे. प्रशासनाचा असा क्वचितच पैलू असेल ज्याला त्यांनी स्पर्श केला नसेल.

ते केवळ भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तनवादी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील नाहीत तर सामाजिक परिवर्तन आणि सर्वसमावेशक वाढीसाठीही ते प्रयत्नशील आहेत. त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण योजना आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला जोरदार चालनाही दिली आहे. जसं की, आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप इंडिया सारख्या योजनांनी आर्थिक गुणक म्हणून काम केले आहे. त्यांनी केवळ व्यवसाय आणि उत्पादन संधी निर्माण केल्या नाहीत तर लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देखील  निर्माण केला आहे.

पंतप्रधान मोदींनी सामाजिक क्षेत्र, कृषी अर्थव्यवस्था आणि देशाच्या अविकसित क्षेत्रांवर तितकेच लक्ष केंद्रित केले आहे. ज्यामुळे विकास सर्वसमावेशक आणि शाश्वत असल्याचे सुनिश्चित झाले आहे. स्वच्छ भारत, जन धन योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि आयुष्मान भारत यांसारख्या त्यांच्या योजनांनी भारतात एक मोठा बदल घडवून आणला आहे.

प्रश्न 12: तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या इतर क्षेत्रांमध्ये खूप टीकेला सामोरं जावं लागलं, मग ते ऑस्ट्रेलिया, श्रीलंका किंवा भारताच्या विविध भागात तुम्ही केलेली गुंतवणूक असो. अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निदर्शनं झाली आहेत आणि तुम्हाला या वादळांचा सामना करावा लागेल. या सगळ्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे?

गौतम अदाणी: राज, हा एक चांगला प्रश्न आहे. गौतम अदाणी हे एक लोकशाही भारताचे उत्पादन आहे. निषेध, टीका आणि आरोप हे लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. खरं तर तीच लोकशाहीची व्याख्या आहे. मला ठाम विश्वास आहे की, आपल्या लोकशाहीने आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य आणि अनेक संधी दिल्या आहेत आणि त्याचा फायदा आपल्या सर्वांना झाला आहे. त्यामुळे कायद्याच्या मर्यादेत स्वतःचे कार्यात्मक मूल्य असलेल्या लोकशाहीच्या इतर पैलूंबद्दल आम्ही यापुढे तक्रार करू शकत नाही.

तुम्ही याची तुम्ही प्रशंसा कराल की, आम्ही पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आहोत जे कामाच्या बाबतीत सर्वात कठीण मानलं जातं. अशा आव्हानांना मी अनेकदा तोंड दिले आहे. मी टीकेबाबत खूप खुल्या दिलाचा आहे. माझ्यासाठी संदेश नेमका काय आहे ते महत्त्वाचां असतं, तो कशा पद्धतीने येतोय ते महत्त्वाचं नसतं. मी नेहमी आत्मपरीक्षण करतो आणि इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मला जाणीव आहे की, मी परिपूर्ण नाही किंवा मी नेहमीच बरोबर नाही. प्रत्येक टीका मला स्वतःला सुधारण्याची संधी देते.

प्रश्न 13: एवढ्या सर्व टीकेनंतरही तुम्ही हार मानली नाही. हा अदाणी संस्कृतीचा भाग आहे?

गौतम अदाणी: होय.. हार मानणे हा अदाणीच्या संस्कृतीचा कधीच भाग नव्हता. गेल्या काही वर्षांत, अदाणी समूहाने समस्या सोडवण्याच्या वृत्तीसह एक मजबूत आणि व्यावसायिक टीम विकसित केली आहे. आम्ही नेहमी उपाय शोधत असतो. भारतासारख्या गतिमान लोकशाहीमध्ये आमची कौशल्यं अधिक वाढीस लागली आहेत. त्यामुळे माझ्या समूहाला आणि मला  असा विश्वास आहे की आम्ही जगाच्या कोणत्याही भागात व्यवसाय करू शकतो.

मी लहानपणापासूनच आपत्ती आणि संकटांचा सामना केला आहे. या प्रत्येक प्रसंगाने मला अनेक मौल्यवान धडा शिकवला आहे आणि मला मजबूत बनवलं आहे. म्हणूनच मी माझ्या टीमला नेहमी म्हणतो: ‘संकट कधीही वाया जाऊ देऊ नका’.

प्रश्न 14: तुम्ही हरित ऊर्जेवर, विशेषत: सौर आणि हायड्रोजनवरही मोठी गुंतवणूक करत आहात. ग्रीन हायड्रोजन हा इंधनात रूपांतरित करण्याचा खर्च पाहता हा व्यवसाय नजीकच्या काळात व्यवहार्य असेल याबाबत तुम्हाला किती विश्वास वाटतो?

गौतम अदाणी: हरित ऊर्जा हा अगदी माझ्या आवडीचा विषय आहे आणि ऊर्जा परिवर्तन ही केवळ एक मोठी व्यावसायिक संधी नाही तर भावी पिढ्यांसाठी ती आपली जबाबदारी देखील आहे. भारत सरकारने एक अतिशय आकर्षक उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजना (PLI) आणली आहे. ज्यामुळे ग्रीन हायड्रोजन व्यवसाय हा व्यवहार्य आणि आकर्षक झाला आहे. किंबहुना, मला खात्री आहे की, या सक्षम पाठिंब्यामुळे आपण केवळ देशांतर्गत मागणीच पूर्ण करणार नाही तर लवकरच ग्रीन हायड्रोजन निर्यातदार देखील बनू.

प्रश्न 15: धीरूभाई अंबानींसारख्या पहिल्या पिढीतील उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुम्हीही पहिल्या पिढीतील उद्योजक आहात. तुम्ही गुरू म्हणून कोणाकडे पाहता?

गौतम अदाणी: धीरूभाई अंबानी हे भारतातील लाखो उद्योजकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी हे दाखवून दिले आहे की, एक नम्र व्यक्ती कोणत्याही पाठिंब्याशिवाय किंवा संसाधनांशिवाय आणि सर्व अडचणींविरुद्ध केवळ जागतिक दर्जाचा व्यवसाय समूह स्थापन करू शकत नाही तर आपला एक वारसा देखील सोडून जातो. पहिल्या पिढीतील उद्योजक असल्याने आणि विनम्र सुरुवात केल्यामुळे मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली आहे.

प्रश्न 16: पुढे पाहता, भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे आणि तुम्हाला पुढील काही वर्षात भारताचा विकास कसा दिसतोय?

गौतम अदाणी: आपल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात, GDP च्या पहिल्या ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 58 वर्षे लागली, पुढच्या ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्यासाठी 12 वर्षे आणि तिसऱ्या ट्रिलियनपर्यंत फक्त पाच वर्षे लागली. पण आता, जर तुम्ही आपली सामाजिक आणि आर्थिक सुधारणांची गती पाहिली तर, मला दिसत आहे की, भारत पुढील दशकात दर 12 ते 18 महिन्यांनी त्याच्या GDP मध्ये एक ट्रिलियन डॉलर्सची भर घालत राहील.

भारताच्या विकास आणि समृद्धीबाबत मी खूप आशावादी आहे. हा आशावाद यामधून येतो की, 2050 मध्ये आपल्याकडे 1.6 अब्ज लोकांचा तरुण भारत असेल, ज्यांचे सरासरी वय हे 38 वर्ष असेल. तसेच जगातील सर्वात जास्त मध्यमवर्गीय लोकसंख्याही आपल्याकडे असेल. ज्यामुळे भारताची वाढ आणि समृद्धीही होईल आणि ती 30 ट्रिलियनची डॉलरची अर्थव्यवस्था होईल. त्यामुळे हे शतक भारताचे आहे हे उघड आहे.

प्रश्न17: शेवटी, अनेक तज्ज्ञांना असे वाटते की, 2023 मध्ये जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे. तुम्हाला अशा वर्तवल्या जाणाऱ्या अंदाजांबद्दल काळजी वाटते का?

गौतम अदाणी: राज, मी जन्मजात आशावादी आहे आणि मी कधीही आशा सोडत नाही. मला आठवते की, 2008 च्या जागतिक आर्थिक संकटाच्या वेळी अनेक पंडितांनी भारतासाठी अशीच निराशाजनक परिस्थिती असल्याचं भविष्य रंगवलं होतं. पण भारताने त्यांची भविष्यवाणी खोटी ठरवली होती. त्यामुळे मला आशा आहे की, पुढील केंद्रीय अर्थसंकल्प या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक उत्तम संधी प्रदान करेल. भांडवली खर्च, रोजगार, सामाजिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केल्यास जागतिक मंदीचा सामना करण्यास मदत होईल आणि भारत मजबूत होईल.

राज चेंगप्पा: याच आशावादी नोटवर… या विशेष मुलाखतीसाठी धन्यवाद.. आणि आम्ही आशा करतो की, 2023 खूप आनंद आणि समाधान घेऊन येईल आणि भारताला महान बनवेल. इंडिया टुडे मासिकाने तुम्हाला 2022 सालचं न्यूजमेकर घोषित केल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.

गौतम अदाणी: धन्यवाद राज

    follow whatsapp

    ADVERTISEMENT