Nipah Virus : निपाह विषाणूचा संसर्ग कसा होतो? लागण झाल्यास उपाय काय? समजून घ्या…
देशात आणि राज्याच्या उंबरठ्यावर कोरोनाची तिसरी लाट धडका मारण्यास सुरुवात झालेली असताना केरळातून चिंतेत भर टाकणारी बातमी आली. केरळमध्ये एका १२ वर्षीय मुलाचा निपाह व्हायरसने मृत्यू झाला. केरळमध्ये आणखी काही रुग्ण आढळून आले आहेत. केरळातील निपाह व्हायरसच्या संसर्गानंतर इतर राज्येही सतर्क झाली आहेत. लोकांनाही याबद्दल वेगवेगळे प्रश्न पडताना दिसत आहेत. तर जाणून घेऊया निपाह व्हायरसबद्दलच्या […]
ADVERTISEMENT

देशात आणि राज्याच्या उंबरठ्यावर कोरोनाची तिसरी लाट धडका मारण्यास सुरुवात झालेली असताना केरळातून चिंतेत भर टाकणारी बातमी आली. केरळमध्ये एका १२ वर्षीय मुलाचा निपाह व्हायरसने मृत्यू झाला. केरळमध्ये आणखी काही रुग्ण आढळून आले आहेत.
केरळातील निपाह व्हायरसच्या संसर्गानंतर इतर राज्येही सतर्क झाली आहेत. लोकांनाही याबद्दल वेगवेगळे प्रश्न पडताना दिसत आहेत. तर जाणून घेऊया निपाह व्हायरसबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी…
निपाहचा व्हायरस कुठे आढळला?
निपाह (एनआयव्ही) विषाणूमुळे माणूस आणि प्राणी अशा दोघांनाही गंभीर स्वरुपाचे आजार होऊ शकतात. सर्वप्रथम निपाह व्हायरस सर्वप्रथम १९९८ मध्ये मलेशियातील वराहपालकांमध्ये आढळला होता. त्यानंतर हळूहळू संपूर्ण जगभरात निपाहचा प्रसार झाला. वाटवाघळामधून या व्हायरसचा प्रसार होतो.