गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन का करत नाहीत? कारण माहित आहे का?
गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला म्हणजेच येत्या बुधवारी आहे. याचदिवशी विविध सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे मागच्या दोन वर्षात पहिल्यांदाच धुमधडाक्यात गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जाईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा होणार विराजमान गणेश चतुर्थीच्या […]
ADVERTISEMENT

गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला म्हणजेच येत्या बुधवारी आहे. याचदिवशी विविध सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे मागच्या दोन वर्षात पहिल्यांदाच धुमधडाक्यात गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जाईल.
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा होणार विराजमान
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. गणेश पुराणात दिलेल्या माहितीनुसार गणपती बाप्पाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला. त्या दिवशी बुधवार होता. या वर्षीही बुधवार आणि गणेश चतुर्थीचा योग जुळून आला आहे. त्यामुळे या वर्षीच्या गणेश चतुर्थीला विशेष महत्त्वही आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी का करत नाही चंद्रदर्शन?
पुराणात सांगितल्या गेलेल्या कथेनुसार एकदा गणपती बाप्पा मूषकावर स्वार होऊन जात होता. त्यावेळी तो घसरला. ते पाहून चंद्राला हसू आवरलं नाही. चंद्राने गणपती बाप्पाकडे पाहून जोरजोरात हसण्यास सुरूवात केली. ज्यानंतर बाप्पा रागवला. गणपती बाप्पाने चंद्राला शाप दिला दिला की आजपासून तुझ्याकडे कुणीही पाहणार नाही. हे झाल्यानंतर चंद्र घाबरला. चंद्राने बाप्पाची तपश्चर्या केली. त्यानंतर बाप्पा चंद्रावर प्रसन्न झाला. बाप्पाने चंद्राला उःशाप दिला तो असा होता की ज्या दिवशी गणेश चतुर्थी आहे त्यादिवशी जर कुणी तुझे तोंड पाहिले तर त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन त्याज्य मानलं गेलं आहे.