पुणे : विसर्जन मिरवणुकीत पोलिस आयुक्त गुप्ता संतापले; भाजपचे माजी नगरसेवक पोटेंसह वाद
पुणे : पुण्यात २२ तास उलटल्यानंतरही अद्याप गणपती विसर्जन मिरवणूक सुरु आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान शुक्रवारी रात्री विसर्जन मिरवणुकीमध्ये काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी नेहमी हसतमुख असणारे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता भाजपचे माजी नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. पुण्यात नेमके काय घडले? पुण्यात भाजपचे […]
ADVERTISEMENT

पुणे : पुण्यात २२ तास उलटल्यानंतरही अद्याप गणपती विसर्जन मिरवणूक सुरु आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान शुक्रवारी रात्री विसर्जन मिरवणुकीमध्ये काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी नेहमी हसतमुख असणारे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता भाजपचे माजी नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले.
पुण्यात नेमके काय घडले?
पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे (नवनाथ) अचनाक गणेश मंडळ कुमठेकर रस्त्यावरून तब्बल दोन तास जागेवरून हलले नाही. त्यामुळे दोन तास पाठीमागील मंडळे पुढे जाऊ शकली नाहीत. पाठीमागील मंडळांनी आणि पोलिस प्रशासनाने वारंवार विनंती करूनही पोटे यांचे मंडळ ऐकत नव्हते. त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्त गुप्ता मंडळाचा डी. जे. बंद करण्यासाठी गेले.
पनवेलमध्ये विसर्जन घाटावर ११ जणांना विजेचा धक्का : ९ महिन्यांची चिमुरडीही जखमी
मात्र तरीही दीपक पोटे यांनी मंडळ अलका टॉकीज चौकात येताच महापालिका स्टेजवर जाऊन स्वतः माईक हातात घेतला. त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना डी जे पुन्हा लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता चांगलेच संतापले. गुप्ता स्वःत महापालिकेच्या स्टेजवर गेले आणि त्यांनी डी जे बंद करण्यास सांगितले. तसेच महापालिका अधिकाऱ्यांना झापलं. त्यानंतर रात्री बारा वाजता पोटे यांचे गणेश मंडळ अलका टॉकीज चौकातून विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ झाले.