राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार! PM मोदींकडे स्वतःच केली मोठी मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : वादग्रस्त ठरलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदावरुन जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यांनी स्वतः राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. राजभवनातून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मनन करण्यात घालविण्याचा मानस असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधानांना कळवलं आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली आहे. (Governor Bhagat Singh Koshyari expressed his desire to resign from the post of Governor to the Prime Minister narendra modi)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये :

“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.

ADVERTISEMENT

माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ADVERTISEMENT

आजवरचे सर्वात वादग्रस्त राज्यपाल :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आजवरचे सर्वात वादग्रस्त राज्यपाल मानले जातात. नोव्हेंबर २०१९ मधील वादग्रस्त शपथविधी, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वादग्रस्त संबंध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबतची वादग्रस्त विधान, मुंबईबाबतचं वादग्रस्त वक्तव्य असे अनेक मुद्दे त्यांच्यासाठी वादाचे ठरले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT