राज्यपालांनी स्टेजवरच काढला महिलेच्या तोंडावरचा मास्क
पुणे: कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर कोरोना प्रोटोकॉल पाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्क लावणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना देखील मास्क घालणं देखील गरजेचं आहे. पण याच प्राथमिक गोष्टीचा विसर खुद्द राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पडल्याचं दिसत आहे. कारण एका कार्यक्रमात राज्यपाल […]
ADVERTISEMENT

पुणे: कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर कोरोना प्रोटोकॉल पाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्क लावणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना देखील मास्क घालणं देखील गरजेचं आहे. पण याच प्राथमिक गोष्टीचा विसर खुद्द राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पडल्याचं दिसत आहे.
कारण एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी सत्कार करतेवेळी चक्क एका महिलेच्या तोंडावरचा मास्कच खाली घेतल्याचं समोर आलं आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जास्तीत जास्त कोरोना नियमाचं पालन करण्याचं आवाहन सातत्याने करत आहेत. पण दुसरीकडे राज्यपालांच्या या वागण्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा यादरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.