Train Accident: एक्सप्रेसचे तब्बल 12 डब्बे घसरले, 4 प्रवाशांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मुंबई तक

Bikaner express derailed: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी भागातील मैंगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस (15633) रुळावरून घसरुन भीषण अपघात झाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सुमारे 20 जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात ट्रेनचे तब्बल 12 डबे रुळावरून घसरले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वाढली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Bikaner express derailed: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी भागातील मैंगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस (15633) रुळावरून घसरुन भीषण अपघात झाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सुमारे 20 जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात ट्रेनचे तब्बल 12 डबे रुळावरून घसरले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन बिकानेरहून गुवाहाटीला जात होती. दरम्यान, मैंगुडी येथे हा अपघात झाला. माहिती मिळताच, रेल्वे पोलीस प्रशासनासह जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना रेल्वेच्या बोगीतून बाहेर काढल्यानंतर नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.

ही घटना गुरुवारी सायंकाळी 5.15 च्या सुमारास घडली. बिकानेर एक्सप्रेस ट्रेनचे 12 बोगी रुळावरून घसरले असून प्रवाशांनी भरलेले 4 डबे पूर्णपणे उलटले आहेत. यातील एक डबा तर थेट नजीकच्या पाण्यात गेला होता. आता त्यात अडकलेल्या प्रवाशांची सध्या सुटका करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp