Omicron च्या पार्श्वभूमीवर राज्यात Lockdown लागणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलली आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जमावबंदीचे आदेश दिले असून लग्नसमारंभापासून राजकीय कार्यक्रमापर्यंत प्रत्येक कार्यक्रमासाठी उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घातली आहे. सध्या राज्यात ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याच्या विचारात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

लॉकडाउन लावायचं की नाही हे ऑक्सिजनच्या मागणीवर ठरवलं जातं. ज्या दिवशी आपल्याला ८०० मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज लागेल त्या दिवशी लॉकडाउन लावायचं असं ठरलं होतं. पण सध्या ज्या गतीने रुग्णसंख्या वाढते आहे ते पाहता ही ऑक्सिजन मर्यादा ५०० मेट्रीक टनावर आणावी लागेल असं दिसतंय. ही मर्यादा ओलांडली गेली तर लॉकडाउनचा विचार करावा लागेल, राजेश टोपे जालन्यात बोलत होते.

लस घेतलेल्यांचंही ‘ओमिक्रॉन’ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी पुढे बोलत असताना राजेश टोपेंनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी घ्यावी यासाठी आम्ही या गोष्टी सांगत आहोत. ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजनची गरज लागेल असं आता तरी वाटत नाही. परंतू सहव्याधी असलेले रुग्ण आणि वयोवृद्धांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांनाच पुढचे काही दिवस सतर्कता बाळगावी लागणार आहे.

सध्याच्या घडीला जास्तीचे निर्बंध लावण्याचा आमचा हेतू नाही, सरकारची तशी इच्छाही नाही आणि गरजही वाटत नाही. परंतू नागरिकांच्या काळजीपोटी सध्या या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कोणीही याचा गैरअर्थ काढू नये, असं राजेश टोपे म्हणाले.

ADVERTISEMENT

ना सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्यावर मास्कचा पत्ता नाही; संजय राठोडांकडून कोरोनाचे नियम पायदळी

ADVERTISEMENT

राज्य सरकारने सध्या रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदीची घोषणा केली आहे. ज्यात ५ पेक्षा जास्त लोकं सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ शकणार नाहीयेत. राज्यात सध्याच्या घडीला कोरोनाचे १ हजाराच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे भविष्यात येणारी तिसरी लाट ही ओमिक्रॉनची असण्याची शक्यता असल्याचं टोपेंनी बोलून दाखवलं. यामुळेच नागरिकांनी सध्या घाबरुन न जाता नियमांचं पालन करण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिका सज्ज – महापौर किशोरी पेडणेकर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT