क्रूरतेचा कळस! मृत्यू झाल्यानंतरही नराधम करत राहिले अत्याचार; रिपोर्ट बघून पोलिसही हादरले

शेळ्या चारण्यासाठी गेलेली 16 वर्षाची मुलगी झाली होती बेपत्ता; 'माझ्या संपूर्ण आयुष्यात अशी घटना बघितली नाही'
क्रूरतेचा कळस! मृत्यू झाल्यानंतरही नराधम करत राहिले अत्याचार; रिपोर्ट बघून पोलिसही हादरले
बलात्कार करून मुलीची करण्यात आली हत्या. (Accused continued to rape Bundi girl even after her death)(प्रातिनिधिक फोटो)

महिलांवरील वाढत्या अत्याचारांचा मुद्दा देशात गंभीर मुद्दा बनलेला असतानाच हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या 16 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर आरोपींनी पीडितेसोबत केलेल्या क्रूर अत्याचार उजेडात आले आहेत.

पोस्टमॉर्टम रिर्पोटमधील माहिती वाचून पोलिसही हादरले. 'माझ्या संपूर्ण आयुष्यात अशी घटना बघितली नाही', अशी उद्विग्न प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्याने या घटनेवर दिली.

बलात्कार करून मुलीची करण्यात आली हत्या. (Accused continued to rape Bundi girl even after her death)
रायगड : पोलिसाचा विवाहीत महिलेवर बलात्कार, पती आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी देत केले अत्याचार

अंगावर शहारा आणणारी ही घटना राजस्थानातील बुंदी जिल्ह्यात घडली आहे. 16 वर्षाची आदिवासी मुलगी शेळ्या चारायला घेऊन गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली. 23 डिसेंबर रोजी बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शनी बलात्कार करून मुलीची हत्या करण्यात आल्याचं निदर्शनास आलं होतं.

बलात्कार करून मुलीची करण्यात आली हत्या. (Accused continued to rape Bundi girl even after her death)
अंबरनाथ हादरलं! 21 वर्षीय तरुणीला बोलावून घेत तीन मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

त्यानंतर मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर पोलिसही हादरून गेले. अत्याचार करत असतानाच मुलीचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतरही आरोपी अत्याचार करत राहिल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं आहे.

शेळ्या घेऊन गेलेल्या मुलीवर तीन नराधमांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने त्यांना विरोध केला. त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीच्या गळ्याला ओढणीने फास लावला आणि अत्याचार केला. मुलीच्या अंगावर जखमा आढळून आल्या असून, गुप्तांगाच्या ठिकाणी 30 पेक्षा अधिक जखमा आढळून आल्या आहेत. अत्याचार करत असतानाच मुलीचा मृत्यू झाला, पण आरोपी अत्याचार करतच राहिल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे.

बलात्कार करून मुलीची करण्यात आली हत्या. (Accused continued to rape Bundi girl even after her death)
डोक्यात दगड घालून तरूणीची हत्या, कराड तालुक्यातली धक्कादायक घटना

या घटनेवर बुंदीचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. 'इतकी भयंकर घटना मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी बघितली नाही. बुंदी येथील बार असोसिएशनने आरोपींची केस न लढण्याची घोषणा केली आहे,' असं यादव म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in