तेल विहिरींवर कसं काम केलं जातं, कर्मचाऱ्यांना पगार किती असतो?, जाणून घ्या सविस्तर
मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) देशाच्या किनारपट्टी राज्यांमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अब्जावधी रुपयांचं नुकसान देखील झालं आहे. या वादळामुळे समुद्राच्या आत एक मोठा अपघात झाला. नवरत्न कंपन्यांमधील तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (ONGC) तेल विहिरींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसला. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल […]
ADVERTISEMENT

मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) देशाच्या किनारपट्टी राज्यांमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अब्जावधी रुपयांचं नुकसान देखील झालं आहे. या वादळामुळे समुद्राच्या आत एक मोठा अपघात झाला. नवरत्न कंपन्यांमधील तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (ONGC) तेल विहिरींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसला.
या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक मृत्यूच्या दाढेत कसे अडकले होते हेच या व्हीडिओमधून पाहायला मिळत आहे.
#ONGC rig falling into the sea ? #CycloneTauktae aftermath pic.twitter.com/HsXmCU0MCl
— Milly Moitra ? (@_DesiBabe) May 19, 2021
या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांना तात्काळ वाचविण्यात आलं. दरम्यान, Barge P305 या अपघातात तब्बल 86 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 188 जणांना वाचविण्यात आलं आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
दरम्यान, तेल विहिरींवर काम करणे खरोखरच धोकादायक आहे काय? तिथे काम करणारे लोक आपले प्राण धोक्यात टाकून काम करतात का? तेलांच्या विहिरींच्यावर तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर नेमकं कसं काम केलं जातं? चला जाणून घेऊया याविषयी सविस्तरपणे.