मृत्यूच्या अवघ्या काही क्षण आधी बहुतांश लोक कोणते तीन शब्द बोलतात ठाऊक आहे? ‘या’ नर्सने दिलं उत्तर..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमेरिकेच्या एका नर्सचा व्हीडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या नर्सने सोशल मीडियावर एक खुलासा केला आहे. या नर्सचं नाव ज्युली असं आहे. मृत्यू येण्याच्या अवघ्या काही क्षण आधी लोक काय बोलतात ते तिने सांगितलं आहे. जुलीचे टिकटॉकवर 3 लाख 72 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या ठिकाणीच जुलीने तिचा अनुभव सांगितला आहे. जाणून घेऊया अमेरिकेच्या या नर्सने नेमकं काय म्हटलं आहे?

हॉस्पिटल नर्स म्हणून जुलीने कॅलिफोर्निया येथील लॉस एंजिल्समध्ये पाच वर्षे काम केलं आहे. त्याआधी नऊ वर्षे ती आयसीयूमध्ये नर्स होती. तिने आत्तापर्यंत 14 वर्षे नर्स म्हणून काम केलं आहे. तिने एक टिकटॉक व्हीडिओ तयार केला आहे ज्यामध्ये लोक मृत्यूच्या आधी कोणते शब्द बोलतात हे तिने सांगितलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मृत्यूच्या पूर्वी नेमकं काय घडतं?

जुलीने सांगितलं की मृत्यू येणार ही चाहूल रूग्णाला लागली की तो त्याच्या शेवटच्या घटका मोजू लागतो. त्याच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत एक विशिष्ट प्रकारचा बदल होतो. एवढंच नाही तर त्याच्या त्वचेचा रंगही काही प्रमाणात बदलतो. कधी कधी ताप येणं, आपल्या जवळच्या लोकांची नावं पुटपुटणं असंही रूग्ण करतात. बहुतांश लोक मृत्यूपूर्वी आय लव्ह यू हे तीन शब्द बोलतात असं जुलीने सांगितलं आहे. एवढंच नाही तर बऱ्याचदा रूग्ण आपल्या आई वडिलांना हाक मारतात. जे की जगात नाहीत. ज्यांचा आधीच मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

आणखी एका व्हीडीओमध्ये जुली म्हणते की मृत्यू होण्याच्या आधी अनेक रूग्णांना सावल्या दिसू लागतात. या सावल्या त्यांच्या आपल्याच लोकांच्या असतात ज्यांचा आधी मृत्यू झाला आहे. त्यांना पाहून आता मी पण घरी येतो आहे असंही काही रूग्ण म्हणतात. मृत्यूबाबत मला बरीच माहिती मिळाली आहे कारण मी रूग्णांना तशा अवस्थेत प्राण सोडताना पाहिलं आहे. मात्र लोक याबाबत बोलू इच्छित नाहीत. मी जो व्हीडिओ केला होता तो सहा महिन्यांपूर्वी केला होता तो इतका व्हायरल होईल असं वाटलं नव्हतं असंही जुली म्हणते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT