हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भित्रं सरकार पाहिलेलं नाही’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी
मुंबई: साधारण वर्षभर विधानसभेचं अध्यक्षपद हे रिक्त आहे. त्यामुळे आता सुरु असलेल्या अधिवेशनात अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मात्र, ही निवड आवाजी मतदानाने होणार असल्याने त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. याचबाबत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर तुफान टीका केली आहे. हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत भित्रं सरकार आहे. अशा […]
ADVERTISEMENT

मुंबई: साधारण वर्षभर विधानसभेचं अध्यक्षपद हे रिक्त आहे. त्यामुळे आता सुरु असलेल्या अधिवेशनात अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मात्र, ही निवड आवाजी मतदानाने होणार असल्याने त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. याचबाबत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर तुफान टीका केली आहे. हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत भित्रं सरकार आहे. अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
पाहा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विधानसभेत नेमकं काय घडलं
-
महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं इनसिक्युअर सरकार कधीही पाहिलेलं नाही: फडणवीस
‘ज्या सरकारजवळ 170 चं बहुमत आहे असं सांगितलं जातं. 60 वर्षांहून अधिक काळ झालाय महाराष्ट्र निर्मितीला आणि अचानक एवढी भीती का सरकारी पक्षाच्या मनामध्ये? की, जे सिक्रेट बॅलेटने अध्यक्षाची निवड व्हायची ती आता आपण वेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय करतोय. सत्ता पक्षांना आपल्या आमदारांवर विश्वास उरलेला नाही?’