Maharashtra Rain: पालघर, पुणे आणि साताऱ्यात ऑरेंज अलर्ट, पावसामुळे आत्तापर्यंत ९९ जणांचा मृत्यू
मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम आहे. अनेक शहरांमध्ये पावसाच्या सरींवर सरी कोसळत आहेत. अशात आता पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात IMD ने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला गेला आहे. Orange alert issued […]
ADVERTISEMENT

मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम आहे. अनेक शहरांमध्ये पावसाच्या सरींवर सरी कोसळत आहेत. अशात आता पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात IMD ने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला गेला आहे.
Orange alert issued in Palghar district, Pune, & Satara today. Yellow alert issued in Mumbai, Thane, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Nashik, Kolhapur, Akola, Amravati, Bhandara, Buldhana, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Washim, & Yavatmal, today. pic.twitter.com/aFRKspL9hA
— ANI (@ANI) July 15, 2022
राज्यात जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाची धुवाँधार हजेरी आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पूरस्थिती आहे. या पावसात आत्तापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७ हजारांहून जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम तसंच मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. मंत्रालय नियंत्रण कक्षाने सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांशी संपर्क ठेवला आहे. पूर स्थितीबाबत उपाय योजना प्रशासनातर्फे NDRF आणि SDRF च्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात आत्तापर्यंत १४ एनडीआरएफ आणि ६ एसडीआरएफ पथकं तैनात आहेत.
पालघरसह (Palghar) इतर ठिकाणी NDRF पथक तैनात
मुंबई, ठाणे, रायगड-महाड, रत्नागिरी-चिपळूण, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर पालघर, सातारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली या ठिकाणी एनडीआरएफचं प्रत्येकी एक एक पथक तैनात करण्यात आलं आहे. तर गडचिरोलीत एसडीआरएफची २ पथकं तैनात कऱण्यात आलं आहे. तर नांदेड, नाशिक, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये एसडीआरएफचं प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आलं आहे.