महाराष्ट्रात दिवसभरात 3700 हून नव्या रूग्णांचं निदान, 56 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 3783 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात 56 कोरोना बाधित रूग्णांची मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाले आहे. आज राज्यात 4364 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 17 हजार 70 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 3783 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात 56 कोरोना बाधित रूग्णांची मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाले आहे. आज राज्यात 4364 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 17 हजार 70 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.7 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 63 लाख 61 हजार 89 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 7 हजार 930 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 87 हजार 356 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1926 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 49 हजार 34 सक्रिय रूग्ण आहेत.
मुंबईत 514 नवे रूग्ण
मुंबईत 514 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर 604 रूग्णांना आज दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. तर मुंबईत सध्याच्या घडीला 4602 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 1277 दिवसांवर गेला आहे. तर मुंबईचा ग्रोथ रेट 8 ते 14 सप्टेंबर या कालावधीत 0.06 टक्के इतका आहे.