राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो..: अजित पवार
मुंबई: ‘राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो. हे त्रिवार सत्य आहे आणि हे कोणी नाकारुही शकत नाही. आपण खूप जणांनी त्या संदर्भातील अनुभव घेतला आहे.’ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत केलं आहे. विधानपरिषदेचे 10 सदस्य येत्या काळात निवृत्त होणार आहे. याच सदस्यांबाबत अजित पवार बोलत होते. विधानपरिषदेतून […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो. हे त्रिवार सत्य आहे आणि हे कोणी नाकारुही शकत नाही. आपण खूप जणांनी त्या संदर्भातील अनुभव घेतला आहे.’ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत केलं आहे. विधानपरिषदेचे 10 सदस्य येत्या काळात निवृत्त होणार आहे. याच सदस्यांबाबत अजित पवार बोलत होते.
विधानपरिषदेतून ज्या 10 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे त्यात सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. त्यांच्याच विषयी बोलताना अजित पवार यांनी काहीसे चिमटे देखील काढले.
पाहा सदाभाऊ खोत यांच्याविषयी बोलताना अजित पवार नेमकं काय म्हणाले:
‘2014 साली स्वाभिमानी सघंटनेने भाजपसोबत युती केली शेवटच्या टप्प्यात स्वाभिमानीच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी निवड झाली. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून सदाभाऊ खोत यांना संधी मिळाली. मात्र, या काळात सदाभाऊ खोत यांचा स्वाभिमानी संघटनेचा हात सुटला आणि आता ते एकटेच पुढे चालले आहेत.’
‘मध्येमध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात. कधीकधी जयंत पाटील आणि सदाभाऊ बऱ्याचदा गप्पा मारत असतात. आता काय गप्पा मारतात ते माहिती नाही. परंतु त्यांचं याआधी इतकं काही जमायचं नाही. पण राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो. हे त्रिवार सत्य आहे आणि हे कोणी नाकारुही शकत नाही. आपण खूप जणांनी त्या संदर्भातील अनुभव घेतला आहे. हे मी सांगायची गरज नाही.’
उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यांना अडचणीत आणणारे नंदकिशोर चतुर्वेदी आहेत तरी कोण? जाणून घ्या…
‘सदाभाऊ खोत यांचा पेहराव आता बदलला आहे. आज जरा लाइट कलरचा कुडता आहे. परंतु त्याची घडी जास्त कधी मोडत नाही. पूर्वी आंदोलनामुळे रापलेला सदाभाऊंचा चेहरा आता कधी रापलेला दिसत नाही इतका. कारण सभागृहात बसावं लागतं.. एसी आहे.. सगळं काही आहे. गंमतीचा भाग जाऊ दे. पण सदाभाऊंच्या चेहऱ्यावरील हे नवतेज कायम राहू दे. अशा शुभेच्छा मी त्यांना देतो.’
‘काही सदस्य हे या सभागृहात निश्चितपणे परत येतील. त्यात सदाभाऊ भाजप तुम्हाला इथे पुन्हा संधी देईल याबद्दल दुमत नाही. बघू आता आपल्याला थोड्याच दिवसात कळेल.’ अशी तुफान फटकेबाजी अजित पवार यांनी केली.