Adani मुंबईच्या लोकलमध्ये विकायचे वस्तू; वाचा पवारांनी सांगितलेला किस्सा - Mumbai Tak - in the early days gautam adani sold some things in local trains of mumbai read a solid anecdote narrated by sharad pawar - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Adani मुंबईच्या लोकलमध्ये विकायचे वस्तू; वाचा पवारांनी सांगितलेला किस्सा

Entrepreneur Gautam Adani used to sell goods in Mumbai’s local trains: मुंबई: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक अशी ओळख असलेले गौतम अदाणी (Gautam Adani) हे सध्या गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर (Hindenburg Report) त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. तर दुसरीकडे विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, देशातील प्रचंड श्रीमंत उद्योजक […]

Entrepreneur Gautam Adani used to sell goods in Mumbai’s local trains: मुंबई: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक अशी ओळख असलेले गौतम अदाणी (Gautam Adani) हे सध्या गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर (Hindenburg Report) त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. तर दुसरीकडे विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, देशातील प्रचंड श्रीमंत उद्योजक असलेल्या अदाणींचा इथवरचा प्रवास काही फार सोपा नव्हता. कारण स्वत: अदाणी हे कधी काळी मुंबईच्या लोकलमध्ये (Mumbai Local) वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करायचे. आता हे काही आम्ही सांगत नाही. तर स्वत: शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत एक किस्साच लिहून काढल आहे. (in the early days gautam adani sold some things in local trains of mumbai read a solid anecdote narrated by sharad pawar)

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात गौतम अदाणींबाबतचा एक किस्सा लिहला आहे. ज्यात ते गौतम अदाणींना खूप पूर्वीपासून ओळखत असल्याचं म्हणतात. जाणून घेऊयात शरद पवारांनी सांगितलेला नेमका किस्सा काय आहे.

‘आवर्जून उल्लेख करावा लागेल तो, गौतम अदानी या नावाचा. अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा बोलबाला झाला आहे. या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे. कमालीचा कष्टाळू आणि साधा! शून्यातून त्यानं आपलं आजचं साम्राज्य उभं केलं आहे. लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय सुरू करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्यांच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते, पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता.’

Exclusive: मोदींमुळे तुमची भरभराट झाली?, गौतम अदाणी म्हणाले हे तर..

‘पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. यामधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमणभाईंकडे गुजरातमधलं मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुंद्रा वाळवंटी भागातलं बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे. या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हे शिवधनुष्य पेललं. आज पन्नास हजार एक जमिनीवरचं हे बंदर देशातलं सर्वात मोठं आणि अद्ययावत बंदर आहे.’

‘गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. मी गौतमना सुचवलं, ‘वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर उर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही तुम्हीच उतरा.’ एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया इथे गौतम आणि मी एकत्र होतो. त्या वेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी, अशी भावना व्यक्त केली. मी म्हणालो, ‘उद्योग येतील, पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदानी आले आहेत. त्यांना मी विनंती करतो, की उर्जानिर्मितीसाठी या परिसरात त्यांनी प्रकल्प उभा करावा.’ गौतमनीही त्यांच्या भाषणात माझ्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला.’

‘सर्वसाधारणपणे व्यासपीठांवरच्या वक्तव्यांतून फार काही घडतंच असं नाही. पण गौतमनी हा विषय लावून धरला. त्यानं भंडाऱ्यात उर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला. प्रकल्प पूर्ण झाल्यावर तेथून तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर तेथून तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होईल. गौतम यांनी उर्जानिर्मितीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज जवळपास बारा हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे त्यांचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत.’ असा संपूर्ण किस्साच शरद पवारांनी आपल्या पुस्तकात सांगितला आहे.

शरद पवार आणि गौतम अदाणींचे नेमके संबंध कसे?

देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधक हे सातत्याने पंतप्रधान मोदींना अदाणींवरुन टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, अदाणींचे फक्त पंतप्रधान मोदींशीच नव्हे तर अनेक राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी असते.

अदाणी म्हणजे ‘रिझर्व्ह बँक ऑफ बीजेपी’; संजय राऊतांचे स्फोटक ‘रोखठोक’

त्याप्रमाणेच शरद पवारांसोबतही अदाणींचे चांगले संबंध असल्याचं वरच्या किस्सावरुन आपल्याला लक्षात येईलच. साधारण दीड वर्षापूर्वी शरद पवार यांची गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक गुप्त भेट झाल्याची बातमी समोर आली होती. पण ही भेट गौतम अदाणींच्या घरी झाल्याची जोरदार चर्चाही त्यावेळी रंगली होती.

Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ? भारतीय क्रिकेटरला ‘देवी’ म्हणत चिनी फॅन पोहोचला 1300 किमी दूर! शाहरुखच्या ‘जवान’ने 18 दिवसांत पार केला 1000 कोटींचा गल्ला पण… Mumbai : मुंबईतील ‘ही’ 6 भारी ठिकाणं, फॅमिलीसोबत करा एक्सप्लोर!