राहुल गांधींना दोन दिवसात ईडीने विचारले ३० प्रश्न, टायर जाळत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोंदवला निषेध
नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. चौकशीचा तिसरा दिवस असून मागच्या दोन दिवसात ईडीकडून राहुल गांधींना सुमारे ३० प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र राहुल गांधी हे पाठ केल्याप्रमाणे किंवा पढवल्यासारखी उत्तरं देत आहेत असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलंय. राहुल गांधी यांच्या चौकशीचा आजचा तिसरा दिवस आहे. राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरू […]
ADVERTISEMENT

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. चौकशीचा तिसरा दिवस असून मागच्या दोन दिवसात ईडीकडून राहुल गांधींना सुमारे ३० प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र राहुल गांधी हे पाठ केल्याप्रमाणे किंवा पढवल्यासारखी उत्तरं देत आहेत असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलंय. राहुल गांधी यांच्या चौकशीचा आजचा तिसरा दिवस आहे. राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरू असल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. दोन दिवस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
ईडी ऑफिसच्या जवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आजही आंदोलन केलं. यावेळी काही कार्यकर्त्यांनी टायर जाळले. त्यानंतर या घोषणाही दिल्या की कुणीही आमचा आवाज दाबू शकत नाही. राहुल गांधी यांना २ दिवस प्रश्न विचारले जात आहेत. अशात त्यांचे प्रश्न कालच संपू शकले असते मात्र ते ठरवल्यासारखी उत्तरं देत असल्याने आजही त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं. आज राहुल गांधींना यंग इंडिया आणि एजएलच्या निधीबाबत चौकशी करण्यात येते आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांनाही ईडीने नोटीस बजावली होती. १ जून रोजी रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली. या दोघांनाही ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितलं होतं. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र हे सगळं सूडाचं राजकारण आहे असं काँग्रेसने म्हटलं होतं.
सोनिया गांधी यांना कोरोना झाल्याने तसंच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चौकशीसाठी हजर राहता आलं नाही. राहुल गांधीही देशाबाहेर होते. मागच्या दोन दिवसांपासून राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. या मध्ये त्यांना ३० प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नसल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.