वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोलीत टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने चिंतेत भर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे

वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोलीत पॉझिटिव्हिटी रेट वाढला. या चारही जिल्ह्यांमध्ये रविवारी चाचण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. भंडाऱ्याच्या टेस्टि पॉझिटिव्हिटी रेट रविवारी 82.7 टक्के होता, चंद्रपूरचा 70.4 टक्के होता, वर्ध्याचा 71 टक्के तर गडचिरोलीचा 61 टक्के इतका होता. त्या तुलनेत नागपूर आणि गोंदियामध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट कमी होता. मात्र या सगळ्या जिल्ह्यांमध्ये रविवारी टेस्टिंग कमी झालं. याबाबत मुंबई तक ने आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जैस्वाल यांच्याशी संपर्क साधला.

टेस्टिंग कमी का झालं याबाबत काय म्हणतात संजय जैस्वाल?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रविवारचा दिवस होता परवा त्यामुळे नागरिक टेस्टिंग साठी कमी लोक आले होते. टेस्टिंग जरी सुरू असली तरी नागरिक सुटीच्या दिवशी टेस्टिंग ला बाहेर पडत नाही त्यामुळे ग्रामीण जिल्ह्यातील टेस्टिंग कमी झालेली दिसत आहे.

भंडाऱ्यात 497 चाचण्या झाल्या त्यापैकी 239 जण पॉझिटिव्ह आले त्यामुळे टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 82.7 नोंदवला गेला. चंद्रपूरमध्ये 1676 चाचण्या झाल्या त्यापैकी 691 पॉझिटिव्ह होते. पॉझिटिव्हिटी रेट 70. 4 टक्के होता. गोंदियात 37510 टेस्ट झाल्या त्यात 510 पॉझिटिव्ह आढळले. टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 16.6 टक्के नोंदवला गेला. वर्ध्यात 1307 चाचण्या झाल्या त्यापैकी 186 पॉझिटिव्ह आढळले तर पॉझिटिव्हिटी रेट 71 टक्के होता. गडचिरोलीत 639 चाचण्या झाल्या त्यापैकी 233 पॉझिटिव्ह आढळले टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 61 टक्के होता.

ADVERTISEMENT

Mumbai चा ‘टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट’ 10 टक्क्यांच्या खाली, दिवसभरात 6 हजारांपेक्षा जास्त रूग्ण कोरोनामुक्त

ADVERTISEMENT

दिनांक 9 मे 2021

1- भंडारा- 1803 टेस्ट, 411 पॉझिटिव्ह, TPR 30.4%

2- चंद्रपूर- 3960 टेस्ट, 1180 पॉझिटिव्ह, TPR 29.3%

3- गोंदिया- 1017 टेस्ट, 621 पॉझिटिव्ह, TPR 30.1%

4- वर्धा- 3196 टेस्ट, 928 पॉझिटिव्ह, TPR 26.2%

5- गडचिरोली- 2584 टेस्ट, 390 पॉझिटिव्ह,TPR 16.2%

दिनांक 8 मे 2021

1- भंडारा- 1841 टेस्ट, 548पॉझिटिव्ह, TPR 39.7%

2- चंद्रपूर- 3813 टेस्ट, 1160 पॉझिटिव्ह, TPR 38.0%

3- गोंदिया-1731 टेस्ट,306 पॉझिटिव्ह, TPR 20.7%

4- वर्धा- 3055 टेस्ट, 836 पॉझिटिव्ह, TPR 28.5%

5- गडचिरोली- 2455 टेस्ट, 419 पॉझिटिव्ह, TPR 19.7%

7 मे 2021

1- भंडारा- टेस्ट 2226, पॉझिटिव्ह 731, TPR 23.7%

2- चंद्रपूर- टेस्ट 4388, 1449 पॉझिटिव्ह, TPR 34.4%

3-गोंदिया- टेस्ट 1731, 359 पॉझिटिव्ह, TPR 22.2%

4-वर्धा- 2948 टेस्ट, 871 पॉझिटिव्ह, TPR 31.2%

5-गडचिरोली- 2194 टेस्ट, 483 पॉझिटिव्ह, TPR 27.7%

6 मे 2021

1- भंडारा- टेस्ट 2974, पॉझिटिव्ह 527, TPR 19.4%

2- चंद्रपूर- टेस्ट 4170, 1508 पॉझिटिव्ह, TPR 33.4%

3-गोंदिया- टेस्ट 1731, 385 पॉझिटिव्ह, TPR 24.1%

4-वर्धा- 3922 टेस्ट,921 पॉझिटिव्ह, TPR 21.3%

5-गडचिरोली- 2638 टेस्ट, 607 पॉझिटिव्ह, TPR 23 .1%

5 मे 2021

1- भंडारा- टेस्ट 2089, पॉझिटिव्ह 578, TPR 27.4%

2- चंद्रपूर- टेस्ट 5180, 1393 पॉझिटिव्ह, TPR 22.6%

3-गोंदिया- टेस्ट 1731, 418 पॉझिटिव्ह, TPR 33.2%

4-वर्धा- 3202 टेस्ट, 837 पॉझिटिव्ह, TPR 27.1%

5-गडचिरोली- 2478 टेस्ट, 610 पॉझिटिव्ह, TPR 13.8%

5 मे ते 9 मे या कालावधीतला टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेतला तर तोदेखील जास्तच होता. मात्र 10 मे च्या दिवशी भंडारा, चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोलीमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. या वाढलेल्या टेस्ट पॉझिटिव्हिटी रेटने विदर्भातील या चारही जिल्ह्यांची चिंता वाढवली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT