कल्याण : ती आत्महत्या नव्हे हत्या! मुलगा आणि वडील 8 दिवसांपासून घरातच पित होते दारू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कल्याणच्या चिकणघर दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मुलगा आणि पत्नीला मारहाण करत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेनं वेगळंच वळण घेतलं नाही. त्या व्यक्तीने आत्महत्या केली नाही, तर मुलानेच वडिलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. मुलानेच पिताची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. इतकंच नाही, तर भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या आईलाही त्यानेच चाकूने वार करत जखमी केल्याचं उघड झालं आहे.

आईला व मुलाला जखमी करत पित्याने आत्महत्या केल्याचा बनाव मुलाने रचला, मात्र पोलिसांनी 24 तासांतच लोकेशच्या कटाचा पर्दाफाश केला.

कल्याण पश्चिमेकडील चिकणघर परिसरात निखिला हाईट्स ही हाय प्रोफाइल सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये सेवानिवृत्त मोटरमन प्रमोद बनोरिया राहत होते. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेशही राहत होता. गेल्या आठ दिवसांपासून मुलगा आणि वडील घरात दारु पीत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अंधेरीतील दीपा बारचा अखेर पर्दाफाश; 17 बारबालांना लपवलं होतं भिंतीतील भुयारात

घटनेच्या दिवशी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या कौटुंबिक वादातून लोकेश याने वडिलांवर चाकूने हल्ला करत त्यांची हत्या केली. वाद सोडवण्यासाठी आई मध्ये आली. आईने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता लोकेशने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आईही गंभीर जखमी झाली.

ADVERTISEMENT

नंतर हा सर्व प्रकार बघून लोकेश घाबरला स्वत:चा गुन्हा लपविण्यासाठी लोकेशने स्वतःच स्वतःवर वार करून जखमी करून घेतलं. त्यानंतर वडिलांनी त्याच्यावर व त्याच्या आईवर चाकूने हल्ला करत आत्महत्या केली, असं पोलिसांना सांगितलं. लोकेश आणि जखमी आई या दोघांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ADVERTISEMENT

कल्याण : पत्नी व मुलावर हल्ला, स्वतःला संपवलं; घरातील दृश्य पाहून सोसायटीचे सदस्यही हादरले

दरम्यान, लोकेशने वॉचमनला एम्ब्युलन्स पाहिजे म्हणून फोन केला, मात्र वॉचमनला संशय आल्याने त्यांने सोसायटीच्या सदस्यांना सांगितलं. सदस्यांनी घरी जाऊन पाहिलं असता, त्यांना धक्का बसला. रहिवाशांनी

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना एक घटनेबाबत माहिती दिली. घटना कळाल्यानंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले.

चेकअपच्या बहाण्याने कंपाऊंडरने ओपीडीत नेऊन 21 वर्षीय महिलेचा केला विनयभंग, लातूरमधली घटना

पोलिसांना चौथ्या मजल्यावर असलेल्या बनोरिया यांच्या घरात एक तरुण जखमी अवस्थेत आढळला होता. पोलिसानी घरात जाऊन पाहिले असता, एक महिलाही जखमी अवस्थेत आढळून आली. तर एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला आढळला. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास सुरू केला.

लोकेशची आई शुद्धीवर आल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितली व या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी लोकेशच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT