Kalyan Crime : धावत्या लोकलमधून मोबाईल हिसकावून पळणारा चोरटा गजाआड

RPF जवानांनी पाठलाग करुन केली अटक, अट्टल चोरावर १५ गुन्हे आहेत दाखल
Kalyan Crime : धावत्या लोकलमधून मोबाईल हिसकावून पळणारा चोरटा गजाआड

धावत्या लोकल ट्रेनमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला कल्याण आरपीएफ जवानांनी पाठलाग करुन पकडले आहे. रामनजली करुड असे या चोरटय़ाचे नाव आहे. त्याच्या विरोधात मोबाईल हिसकाविण्याचे 15 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण जीआरपी करीत आहेत.

गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी आणि मोबाईल हिसकावून पळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. पाच दिवसापूर्वी एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळणा:या चोरटय़ाला डोंबिवली आरपीएफ महिला जवानाने पाठलाग करुन पकडले होते. आत्ता कल्याण रेल्वे स्थानकात अशीच घटना घडली आहे. कुर्ला ते बदलापूर लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणा:या प्रमोद निशाद हा प्रवासी 23 नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास कल्याणला येत होते. कल्याण रेल्वे स्थानकात गाडी थांबतातच गाडीतच बसलेल्या एका चोरटय़ाने प्रमोद यांच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला.

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर उभ्या असलेल्या आरपीएफ जवानांनी चोरटय़ाला पळत जात असताना पाहिले. त्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. या चोरटय़ाला रेल्वे यार्डातून ताब्यात घेण्यात आले. चोरलेला महागडा मोबाईल आणि चोरटय़ाला कल्याण जीआरपीच्या हवाली करण्यात आले. या प्रकरणी कल्याण जीआरपीचे पोलिस निरिक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले की, रामनजली करुड हा तरुण सराईत चोरटा आहे. त्याच्या विरोधात मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात चोरी केल्या प्रकरणी पंधरा गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा मुळचा दादरचा रहिवासी असून त्याच्याकडून पोलिसांना आतापर्यंच चोरलेले मोबाईल मिळण्याची शक्यता आहे.

Kalyan Crime : धावत्या लोकलमधून मोबाईल हिसकावून पळणारा चोरटा गजाआड
बनावट नोटा छापणाऱ्या एका व्यक्तीला Mumbai Police नी केली अटक

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in