कपिल शर्मा पुन्हा वादात; विवेक अग्निहोत्रीच्या आरोपानंतर चाहते भडकले

मुंबई तक

अभिनेता कपिल शर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. द कपिल शर्मा शो मधून रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या कपिल शर्मावर चाहते भडकले असून, सध्या त्याला ट्रोल केलं जात आहे. काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्मावर आरोप केला असून, त्यामुळे भडकलेल्या चाहत्यांनी कपिलवर निशाणा साधला आहे. या वादात काही जणांनी सलमान खानलाही ओढलं आहे. काश्मीर फाईल्स […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेता कपिल शर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. द कपिल शर्मा शो मधून रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या कपिल शर्मावर चाहते भडकले असून, सध्या त्याला ट्रोल केलं जात आहे. काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्मावर आरोप केला असून, त्यामुळे भडकलेल्या चाहत्यांनी कपिलवर निशाणा साधला आहे. या वादात काही जणांनी सलमान खानलाही ओढलं आहे.

काश्मीर फाईल्स चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवरुन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्मावर गंभीर आरोप केला आहे. विवेक अग्निहोत्रीने एक ट्विट करत कपिल शर्माने चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. कारण चित्रपटात कोणत्याही मोठ्या कलाकाराची भूमिका नाही.

विवेक अग्निहोत्रीचे हे ट्विट वेगाने व्हायरल झालं आणि ट्विटर अनेकांनी यावरून कपिल शर्मावर टीका करण्यास सुरुवात केली. कपिल शर्माला ट्रोल केलं जात आहे. एका व्यक्तीने काश्मीर फाईल्स चित्रपटाचं प्रमोशन कपिल शर्मा शो मध्ये करावं असं म्हटलं होतं. त्यावर चित्रपटात स्टार कास्ट नसल्याने बोलवलं नाही, असं अग्निहोत्रीने म्हटलेलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp