शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेंना ‘त्या’ प्रकरणात दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

विद्या

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाण्याच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेल्या केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालयात दिलासा मिळाला आहे. आनंद दिघे यांचे पुतणे असलेल्या केदार दिघेंवर एका २३ वर्षीय तरुणीने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंबईतील एनएम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालयाने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाण्याच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेल्या केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालयात दिलासा मिळाला आहे. आनंद दिघे यांचे पुतणे असलेल्या केदार दिघेंवर एका २३ वर्षीय तरुणीने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंबईतील एनएम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. एका २३ वर्षीय तरुणीने दिल्लीस्थित उद्योजक रोहित कपूर याच्यावर बलात्कार केल्याचा, तर या बलात्कार प्रकरणी पोलिसांत तक्रार देऊन नये म्हणून केदार दिघेंनी धमकावल्यांचा आरोप केलेला आहे.

एनएम जोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर केदार दिघे यांनी ५ ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. शनिवारी (६ ऑगस्ट) एमएम देशपांडे यांच्या पीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.

केदार दिघे यांना अटकपूर्व जामीन देण्यास पीडितेच्या वकिलांनी विरोध केला. या प्रकरणात आधीच केदार दिघेंना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबद्दलचं समन्स बजावलेलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आदेश देत दिघेंना अटकपूर्वी जामीन मंजूर केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp