किरीट सोमय्यांनी कोल्हापुरात जाऊन अखेर मंत्री हसन मुश्रीफांविरोधात दाखल केली तक्रार

मुंबई तक

कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अखेर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस ठाण्यात जाऊन किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात 127 कोटी भ्रष्टाचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याआधी किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरामध्ये येताच अंबाबाईचं दर्शन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अखेर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस ठाण्यात जाऊन किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात 127 कोटी भ्रष्टाचार केल्याची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, याआधी किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरामध्ये येताच अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते मुरगूडकडे रवाना झाले होते. ज्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात लेखी तक्रार दिलेली आहे.

‘सरकार अस्थिर करण्यासाठी किरीट सोमय्यांचे प्रयत्न’, गृहराज्यमंत्र्यांची टीका

किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp