सायरस मिस्त्रींची मुलं विद्यार्थी, पत्नी कॉर्पोरेट आयकॉन… जाणून घ्या संपूर्ण कुटुंबाबद्दल
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. सायरस मिस्त्री यांचे ४ सप्टेंबर रोजी कार अपघातात निधन झाले. दिवंगत भारतीय उद्योगपती शापूरजी पालोनजी मिस्त्री यांचा धाकटा मुलगा म्हणून सायरस यांनी अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मोठी उंची गाठली होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्रींच्या पाठीमागे दोन मुलं आणि […]
ADVERTISEMENT

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. सायरस मिस्त्री यांचे ४ सप्टेंबर रोजी कार अपघातात निधन झाले. दिवंगत भारतीय उद्योगपती शापूरजी पालोनजी मिस्त्री यांचा धाकटा मुलगा म्हणून सायरस यांनी अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मोठी उंची गाठली होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्रींच्या पाठीमागे दोन मुलं आणि पत्नी होती. मुलांसाठी हजारो कोटींची मालमत्ता पाठीमागे सोडून सायरल अनंतात विलीन झाले आहेत.
पालोनजी ग्रुपचे अनेक व्यावसाय
शापूरजी पालोनजी ग्रुपचे व्यवसाय म्हणजे अभियांत्रिकी आणि बांधकामापासून रिअल इस्टेट, कापड, गृहोपयोगी वस्तू, शिपिंग, प्रकाशन, ऊर्जा आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रांपर्यंत पसरलेला आहे. या ग्रुपमध्ये सुमारे 25,000 कर्मचारी काम करतात. 1991 मध्ये, सायरस मिस्त्री भारतासह जगभरात पसरलेल्या या कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित होते. 1994 मध्ये त्यांना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले. 2012 पर्यंत त्यांनी आपला व्यवसाय नव्या उंचीवर नेला.
टाटा सन्समध्ये कुटुंबाचा 18.4 टक्के हिस्सा
2012 मध्ये टाटा सन्सची कमान त्यांच्या खांद्यावर आली. त्यानंतर त्यांनी चार वर्षे ही जबाबदारी सांभाळली. टाटा समूहासोबत वादविवाद आणि कायदेशीर लढाई लढल्यानंतर त्यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावं लागलं, नंतर कौटुंबिक व्यवसायाकडे वळले. 1865 साली स्थापन झालेल्या, 157 वर्ष जून्या शापूरजी पालोनजी मिस्त्री कुटुंबाची टाटा सन्समध्ये 18.4 टक्के हिस्सेदारी आहे. त्याच वेळी, समूहाचा व्यवसाय जगातील 50 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 2022 मध्ये एसपी ग्रुपची एकूण संपत्ती 30 अब्ज डॉलर आहे.
रतन टाटांशी कुटुंबाचे जवळचे संबंध
पालोनजी कुटुंब हे उद्योगक्षेत्रातील मोठं नाव आहे. सायरस मिस्त्री आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, कुटुंबात त्यांची आई पॅटसी पेरिन दुबाश, मोठा भाऊ शापूर मिस्त्री याशिवाय लैला मिस्त्री आणि अल्लू मिस्त्री या दोन बहिणी आहेत. मिस्त्री यांच्याशिवाय त्यांना पत्नी रोहिका छागला आणि दोन मुले फिरोज मिस्त्री आणि जहाँ मिस्त्री आहेत. सायरस यांच्या एका बहिणीचे लग्न रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झालेले आहे.