लखीमपूर हिंसाचार : माझा मुलगा घटनास्थळी नव्हताच - केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनींचं स्पष्टीकरण
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी

लखीमपूर हिंसाचार : माझा मुलगा घटनास्थळी नव्हताच - केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनींचं स्पष्टीकरण

अजय मिश्रांना पदावरुन हटवा, मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करा - संयुक्त किसान मोर्चाची मागणी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकारानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी स्पष्टीकरण देत आपल्या मुलाचा बचाव केला आहे.

आपला मुलगा घटनास्थळी हजरच नव्हता, तो उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रम स्थळी असल्याचा दावा टेनी यांनी केला आहे.

यावेळी बोलत असताना अजय मिश्रा टेनी यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी काही असमाजिक व्यक्तींनी ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप टेनी यांनी केला आहे. या दगडफेकीमुळे ताफ्यातली एक गाडी पलटल्याचं टेनी यांनी सांगितलं आहे. इतकच नव्हे तर आंदोलनात सहभागी काही असमाजिक तत्वांनी भाजपच्या ३-४ कार्यकर्त्यांना मारपीट करुन हत्या केली आहे.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी
लखीमपूर हिंसा : मृतांचा आकडा आठ वर, केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप

अजय मिश्रा टेनी यांच्या मुलावर काय आहेत आरोप?

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात अजय मिश्रा टेनी यांच्या मुलावर संयुक्त किसान मोर्चा ने गंभीर आरोप केले आहेत. मिश्रा यांच्या मुलाच्या ताफ्यातील गाड्यांनी शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय मंत्र्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

या सर्व निरर्थक आणि खोट्या गोष्टी आहेत. आमचे कार्यकर्ते प्रमुख पाहुण्यांना आणण्यासाठी जात होते. माझ्या मुलाचा प्रश्न आहे तर मी हे सांगू इच्छितो की, हा कार्यक्रम खुल्या मैदानात होता. माझा मुलगा सकाळी ११ वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत याच ठिकाणी हजर होता. हजारो लोकं याचे साक्षीदार आहेत. काही असमाजिक तत्व या आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे. मी शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांना सांगू इच्छितो की असमाजिक लोकं यात सहभागी होत आहेत. तलवार आणि दांडक्यांनी मारहाण करत ३-४ भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे.
अजय मिश्रा टेनी - केंद्रीय गृहराज्यमंत्री

संयुक्त किसान मोर्चाने ही घटना घडल्यानंतर पत्रकार परिषद घेत अजय मिश्रा टेनी यांना तात्काळ पदावरुन हटवण्यात यावं अशी मागणी केली आहे. अजय मिश्रा शेतकऱ्यांवर हल्ले करत आहेत. त्यांच्या मुलगा आणि संबंधित इतरांचं यात नाव आलंय, ज्यांच्यावर IPC 302 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल व्हावा. याचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडे न देता, सर्वोच्च न्यायालयाच्या जजकडे सोपवण्यात यावा.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी
लखीमपूर हिंसाचार : हा हिंसाचार पाहूनही शांत राहणारी लोकं आधीच मेलेली आहेत - राहुल गांधी

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in