नागपूर : भाडेकरुच्या जाचाला कंटाळून घरमालकाची आत्महत्या
कोरोना महामारीच्या काळात लॉकडाउमध्ये घरमालकांनी भाडेकरुंकडून घरभाडं वसुली करताना कोणत्याही प्रकारचा अतिरेक करु नये असं आवाहन काही महिन्यांपूर्वी सरकारतर्फे करण्यात आलं होतं. परंतू नागपुरात एका भाडेकरुने याचा अवाजवी फायदा उचलल्याचं दिसतंय. भाडेकरुच्या जाचाला कंटाळून नागपुरात घरमालकानेच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरात घर भाड्याने घेणाऱ्या एका भाडेकरूने दर महिन्याला घराचे भाडे देणे तर सोडाच…उलट […]
ADVERTISEMENT

कोरोना महामारीच्या काळात लॉकडाउमध्ये घरमालकांनी भाडेकरुंकडून घरभाडं वसुली करताना कोणत्याही प्रकारचा अतिरेक करु नये असं आवाहन काही महिन्यांपूर्वी सरकारतर्फे करण्यात आलं होतं. परंतू नागपुरात एका भाडेकरुने याचा अवाजवी फायदा उचलल्याचं दिसतंय. भाडेकरुच्या जाचाला कंटाळून नागपुरात घरमालकानेच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नागपुरात घर भाड्याने घेणाऱ्या एका भाडेकरूने दर महिन्याला घराचे भाडे देणे तर सोडाच…उलट घरमालकाकडून घर रिकामे करण्यासाठी पैसे वसूल केले. इतकच नव्हे तर या भाडेकरुने नंतर घर मालकाकडून लाखोंची खंडणीही मागितली. घरमालकाने ती देण्यास नकार दिल्यानंतर वारंवार शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
भाडेकरूंच्या या जाचाला कंटाळून अखेर मुकेश रिझवानी या घर मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी मुकेश यांनी भाडेकरूंनी दिलेल्या सर्व त्रास एका व्हिडिओमध्ये सांगत तो व्हिडिओ अनेकांना पाठवला आणि त्यानंतर आत्महत्या केली.
PUBG गेमच्या नादात 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या?, राहत्या घरात घेतला गळफास