राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय; माणसांना या विषाणूपासून धोका आहे का?
लंपी रोगाचं थैमान राज्यभर वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. आत्तापर्यंत 10 हजारपेक्षा जास्त बैल आणि गायींना या रोगाची लागण झाली आहे. तर 300 पेक्षा जास्त जनावरं या लंपी रोगामुळे दगावली आहेत. मागच्या 15 दिवसात बाधित जनावरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वेळीच प्रशासनानं पाऊलं उचलणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याच्या पशुधनाच्या जीविताला […]
ADVERTISEMENT

लंपी रोगाचं थैमान राज्यभर वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. आत्तापर्यंत 10 हजारपेक्षा जास्त बैल आणि गायींना या रोगाची लागण झाली आहे. तर 300 पेक्षा जास्त जनावरं या लंपी रोगामुळे दगावली आहेत. मागच्या 15 दिवसात बाधित जनावरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वेळीच प्रशासनानं पाऊलं उचलणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्याच्या पशुधनाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जनावरांचा कोरोना वाढतोय वेगाने
2020 साली जनावरांना लागण होणारा लंपी हा रोग आला होता. मात्र त्यावेळी संसर्ग होण्याचं प्रमाण जरी जास्त असलं तरी त्यावेळी जनावरांवर याचा जास्त परिणाम होत नव्हता. मात्र या रोगाचं म्युटिशन वाढल्याने संसर्गाचा वेग आणि जनावरांवर होणारा परिणाम वाढला आहे. त्यामुळे हा विषाणू जनावरांच्या अवयवांवर हल्ला करत आहे. त्यामुळे जनावरांचे जीव देखील जात आहेत. कोरोनाप्रमाणे हा रोग संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. गाय आणि बैलांमध्ये हा रोग आढळून येतोय इतर प्राण्यांना याची लागण झालेली नाही. तर मानवावर या विषाणूचा कोणताही परिणाम नाही, असं डॉक्टर सांगतात.
लसीकरणाला सुरुवात