महाराष्ट्र सरकारने संथ गतीने काम करणं सोडावं, कोरोना परिस्थितीवरून भारती पवार यांची टीका

महाराष्ट्र सरकारने संथ गतीने काम करणं सोडावं, कोरोना परिस्थितीवरून भारती पवार यांची टीका

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या आणि कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईत सर्वाधिक रूग्णवाढ होते आहे. या संदर्भात राज्य सरकारने वेळीच पावलं उचलली पाहिजेत. सध्या राज्य सरकार काम करतं आहे मात्र ते संथ गतीने सुरू आहे. राज्य सरकारने गती वाढवावी असं म्हणत केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारने संथ गतीने काम करणं सोडावं, कोरोना परिस्थितीवरून भारती पवार यांची टीका
अजित पवार कानीकपाळी ओरडून सांगत होते मास्क लावा, ज्यांनी लावला नाही त्या सगळ्यांना झाला कोरोना

राज्य सरकारने मागणी करूनही केंद्र सरकारने काय दिलं नाही याबाबत राज्यातील कुणी मंत्र्याने लेखी द्यावं, असंही भारती पवारने म्हटलं. राज्याने मागणी करूनही केंद्र सरकारने दिलं नसेल, तर मी या राज्याची हक्काची मुलगी म्हणून ती माहिती मला द्या, असंही भारती पवार यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी चाचण्या वाढवल्या पाहिजेत. त्याचे किट्स घेण्यासाठी राज्यांना निधी दिला आहे. केंद्र सरकारने पूर्ण मदत केली आहे. ओमिक्रॉनच्या आढाव्याबाबत विशेष सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकार सातत्याने गाईडलाईन्सही पाठवत आहे. मुंबईच नाही तर जिथे रूग्ण वाढतील त्यासंदर्भात काय करायचं याचे निर्देश दिले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणं, कारण नसातना प्रवास करणं या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असंही भारती पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन लावायचा असेल तर तो निर्णयही राज्य सरकारला दिला आहे. केरळ आणि महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे असंही भारती पवार म्हणाल्या.

महाराष्ट्र सरकारने संथ गतीने काम करणं सोडावं, कोरोना परिस्थितीवरून भारती पवार यांची टीका
लस घेतलेल्यांचंही 'ओमिक्रॉन'ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा

डॉ. भारती पवार म्हणाल्या, राज्य सरकारने लसींची मागणी केली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या त्या राज्यांनी काय निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही राज्यांच्या मागण्या पूर्ण करत आहे. आता राज्याने काम करण्याची गरज आहे. तसेच सध्या महाराष्ट्र सरकारचे काम संथ गतीने सुरू आहे. राज्य सरकार काम करत आहे परंतु राज्य सरकारने आपल्या कामाची गती वाढवली पाहिजे, असे मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले आहे..

जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.Omicron Variant/India today

प्रत्येक राज्यावर केंद्राचं लक्ष आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास लॉकडाऊन करण्याचे अधिकार राज्याला दिले आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून त्यांनी या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. आताच काळजी घेतली तर प्रसार रोखता येईल. यासाठी केंद्र सरकार सातत्याने नियमावली देत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सर्व राज्यातील आरोग्य सचिवांसोबत चर्चा करत आहे, असे देखील डॉ. भारती पवार या वेळी म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in