Maharashtra Crisis: “भाजपच्या 50 आमदारांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, तर…”
Maharashtra political crisis supreme court hearing : महाराष्ट्रातील सत्तांतरांमध्ये राज्यपालांनी दिलेले आदेश आणि घेतलेल्या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद होताना दिसला. राज्यपालांच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने फेरयुक्तिवाद करताना राज्यपालांच्या बहुमत चाचणी करण्याच्या निर्णयावर बोट ठेवलं. ‘आता आम्हाला सर्व माहिती लक्षात आली आहे’, त्यामुळे फेरयुक्तिवादाचे मुद्दे मांडा, असं कपिल […]
ADVERTISEMENT

Maharashtra political crisis supreme court hearing : महाराष्ट्रातील सत्तांतरांमध्ये राज्यपालांनी दिलेले आदेश आणि घेतलेल्या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद होताना दिसला. राज्यपालांच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने फेरयुक्तिवाद करताना राज्यपालांच्या बहुमत चाचणी करण्याच्या निर्णयावर बोट ठेवलं.
‘आता आम्हाला सर्व माहिती लक्षात आली आहे’, त्यामुळे फेरयुक्तिवादाचे मुद्दे मांडा, असं कपिल सिब्बल यांचा फेरयुक्तिवाद सुरू करण्यापूर्वी सरन्यायाधीशांनी सांगितलं.
त्यानंतर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. “कलम 180 (1) बघा. त्याचबरोबर कलम 2 . जर विधानसभा अध्यक्षांचं पद रिक्त असेल, तर उपाध्यक्ष त्याचं काम करतात. जर उपाध्यक्षांचं पदही रिक्त असेल, तर राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नियुक्ती करू शकतात.”
Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात उलथापालथ होणार? 10 मुद्दे