नवाब मलिकांना अटक झाल्याने महाविकास आघाडी आक्रमक; महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रकरणी बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून महात्मा […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रकरणी बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतील नेते आंदोलनाला बसले आहेत.
“कोणत्याही मंत्र्याचं नाव दाऊदसोबत जोडलं की त्याची बदनामी करायला सुरूवात करतात. नवाब मलिकांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. भाजपा अनेक नेत्यांना धमकावत आहे. दाऊदचे संबंध मुद्दाम मलिकांसोबत जोडले जात आहेत, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. तर बॉम्बस्फोटाचा मलिकांसोबत अजिबात संबंध नाही असंही ते म्हणाले.
ज्या ठिकणी केंद्राला विरोध केला जातो तिथं अशी परिस्थिती आहे. नवाब मलिकांच्यावर केलेले आरोप चुकीच आहेत. ज्याने जागा खरेदी केली म्हणून त्यांना आतमध्ये टाकणे हे अत्यंत चुकीचं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे मी काहीही बोलणार नाही. नवाब मलिक यावर सविस्तर उत्तर देतील राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळ ते आमच्या मंत्रीमंडळात कायम राहतील असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.