Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजाचा मूक हुंकार! आंदोलनात लोकप्रतिनिधी सहभागी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलन
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजाचा मूक हुंकार! आंदोलनात लोकप्रतिनिधी सहभागी

मराठा आरक्षणासाठी यंदाचं पहिलं मूक आंदोलन कोल्हापुरातून सुरू झालं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू झालं आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक आमदार, खासदार यांची उपस्थिती आहे. या मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकरही सहभागी झाले आहेत.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून राज्यात या निकालाचे पडसाद उमटत असून, पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी आज पडली आहे. आरक्षण कायदा रद्द झाल्यापासून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रायगडावरून त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. पहिलं आंदोलन कोल्हापूरात होत असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या या ‘मूक आंदोलन’ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सहभागी झाले आहेत.

सुरुवातीपासूनच आंदोलन न करण्याचं धोरण स्वीकारलेल्या छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी 6 जून रोजी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून आंदोलनाची हाक दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरातून आंदोलनाला सुरूवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. हे मूक आंदोलन असणार असल्याचं त्यांनी नंतर स्पष्ट केलं होतं. आज पहिलं आंदोलन होत असून, सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. मूक आंदोलनात लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार) भूमिका मांडत आहेत.

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजाचा मूक हुंकार! आंदोलनात लोकप्रतिनिधी सहभागी
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी भोसले समितीने ठाकरे सरकारला केल्या 'या' शिफारसी

संभाजीराजेचं आवाहन

आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर प्रारंभी संभाजीराजे यांनी उपस्थिती समुदायाला आवाहन केलं. आजचं आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचं ऐकून घ्या,” असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीला केलं. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडण्यास सुरूवात केली.

“हा लढा मराठा आरक्षणासाठी निर्णायक असून, लोकप्रतिनिधी ताकतीने उतरणार आहे. सकल मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बैठक व्हायला हवी”, असं मत आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर “या आंदोलनात राजकारण होऊ नये. पंतप्रधानांच्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळले आहे. त्यात समन्वय कायम ठेवून हा प्रश्न मिटवावा,’ असं आमदार विनय कोरे म्हणाले. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील यांनी भूमिका मांडल्या.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in