Sandeep Deshpande: “रस्त्यावर पवार असं ओरडत…”, संजय राऊतांना डिवचलं

मुंबई तक

Sandeep Deshpande hits out sanjay Raut : पटलं तर घ्या म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते (Maharashtra NavNirman Sena) संदीप देशपांडे यांनी खासदार संजय राऊत यांना डिवचलं आहे. संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) पत्र लिहून मार्मिक टोले लगावले असून, ‘काही दिवसांनी रस्त्यावर पवार… पवार… असं ओरडत दगड भिरकावत फिरायची पाळी येईल’, असा टोला देशपांडेंनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sandeep Deshpande hits out sanjay Raut : पटलं तर घ्या म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते (Maharashtra NavNirman Sena) संदीप देशपांडे यांनी खासदार संजय राऊत यांना डिवचलं आहे. संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) पत्र लिहून मार्मिक टोले लगावले असून, ‘काही दिवसांनी रस्त्यावर पवार… पवार… असं ओरडत दगड भिरकावत फिरायची पाळी येईल’, असा टोला देशपांडेंनी लगावला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केलं. पटलं तर घ्या म्हणत त्यांनी राऊतांना लक्ष्य केलं आहे.

संदीप देशपांडे राऊतांना म्हणाले, “आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र! हे येडं** मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटीच हे पत्र लिहित आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे.”

Uddhav Thackeray: “…तर 2024 साली भाजपला पाणी पाजणे शक्य”, ठाकरेंचा इशारा

हे वाचलं का?

    follow whatsapp