Mood Of The Nation: पुढचे पंतप्रधान कोण असावेत? PM Modi की आणखी कुणी? वाचा इंडिया टुडेचा सर्व्हे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही 66 टक्क्यांवरून 24 टक्के इतकी झाली आहे. हे आम्ही म्हणतो आहे कारण इंडिया टुडेने केलेला सर्व्हे हा त्याचं महत्त्वाचं कारण आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्या अनुषंगाने विविध चर्चांना म्हणजे जसं की तिसरी आघाडी, विरोधकांची मोट बांधून मोदींना लढा देणं या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशात इंडिया टुडेने काय आहे देशाचा मूड हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार मोदींची लोकप्रियता वर्षभरात कमी झाली आहे. मागच्या वर्षभरात मोदींची लोकप्रियता 66 टक्क्यांवरून 24 टक्क्यांवर आली आहे.

काय म्हणतो आहे हा सर्व्हे ?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑगस्ट 2021 महिन्यात 24 टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे

जानेवारी 2021 या महिन्यात हे प्रमाण 38 टक्के होतं तर ऑगस्ट 2020 महिन्यात हे प्रमाण 66 टक्के होतं.

ADVERTISEMENT

योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील का? हा प्रश्न विचारला गेला तेव्हा ऑगस्ट २०२१ या महिन्यात 11 टक्के लोक हो म्हणाले, जानेवारी 2020 महिन्यात 10 टक्के लोक हो म्हणाले आणि ऑगस्ट 2020 या महिन्यात 3 टक्के लोकांनी योगींच्या नावाला पसंती दर्शवली.

ADVERTISEMENT

हाच प्रश्न राहुल गांधींबाबत विचारण्यात आला तेव्हा

ऑगस्ट 2021 या महिन्यात 10 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पंतप्रधान म्हणून पसंती दर्शवली

जानेवारी 2020 या महिन्यात 7 टक्के लोकांनी राहुल गांधी पंतप्रधान होतील असं मत व्यक्त केलं तर ऑगस्ट 2020 या महिन्यात हे प्रमाण 8 टक्के होतं.

अरविंद केजरीवाल यांना ऑगस्ट 2021 महिन्यात 8 टक्के लोकांनी, जानेवारी 2021 या महिन्यात 5 टक्के लोकांनी तर ऑगस्ट 2020 या महिन्यात 3 टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून पसंती दर्शवली.

हाच प्रश्न जेव्हा ममता बॅनर्जी पंतप्रधान होतील का असा विचारला गेला तेव्हा 8 टक्के लोकांनी ऑगस्ट 2021 या महिन्यात तर 4 टक्के लोकांनी जानेवारी 2021 या महिन्यात 2 टक्के लोकांनी ऑगस्ट 2020 या महिन्यात ममतांच्या नावाला पसंती दर्शवली.

अमित शाह हे मोदींचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. मोदींचा वजीर अशीही त्यांची ख्याती आहे. राजकारणात या दोघांनी एकमेकांच्या साथीने अनेक ध्येयं साध्य केली आहेत. त्यामुळेच अमित शाह यांच्याकडे देशाच्या गृहखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मोदींचे अत्यंत खास असलेले अमित शाह पंतप्रधान होतील का असं विचारण्यात आलं तेव्हा ऑगस्ट 2021 या महिन्यात 7 टक्के लोकांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली. जानेवारी 2021 या महिन्यात 8 टक्के लोकांनी पसंती दर्शवली तर मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात केवळ 4 टक्के लोकांनी अमित शाह यांच्या नावाला पसंती दर्शवली.

सोनिया गांधी पुढच्या पंतप्रधान होतील का? हा प्रश्न विचारला गेला तेव्हा या महिन्यात 4 टक्के लोक हो म्हणाले, जानेवारी महिन्यातही चार टक्के लोकांनीच हो म्हटलं होतं. तर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात 5 टक्के लोक हो म्हणाले होते. प्रियंका गांधीबाबत हेच प्रमाण ऑगस्ट महिन्यात 4 टक्के, जानेवारी महिन्यात 3 टक्के आणि मागील वर्षी याच महिन्यात 2 टक्के इतकं अल्प होतं.

वर्षभर हा सर्व्हे घेण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींची लोकप्रियता 66 वरून थेट 24 टक्क्यांवर आली आहे हे समोर आलं असलं तरीही पुढचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावाला पसंती देणाऱ्यांचीच टक्केवारी ही सर्वाधिक आहे. इंडिया टुडेचा सर्व्हे हेच स्पष्ट करतो की 2024 लाही मोदीच देशाचे पंतप्रधान होतील. आता येणाऱ्या काळात काय होणार हे स्पष्ट होईलच. पण सध्या तरी चित्र हेच आहे की लोकप्रियता कमी झाली असली तरीही मोदीच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.

भारताचे आजवरचे उत्कृष्ट पंतप्रधान कोण याबाबतही मोदींनाच पसंती मिळाली आहे. बघा काय म्हणतो आहे इंडिया टुडेचा सर्व्हे ?

भारताचे आजवरचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण?

काय म्हणत आहेत लोक?

नरेंद्र मोदी 27 टक्के

अटलबिहारी वाजपेयी- 19 टक्के

इंदिरा गांधी- 14 टक्के

लालबहादुर शास्त्री- 6

पी. व्ही. नरसिंहराव- 3 टक्के

मनमोहन सिंग- 11 टक्के

व्ही. पी. सिंग- 2 टक्के

जवाहरलाल नेहरू- 8 टक्के

मोरारजी देसाई- 2 टक्के

राजीव गांधी- 7 टक्के

    follow whatsapp

    ADVERTISEMENT