महाराष्ट्रात 3 हजारांपेक्षा जास्त नवे Corona रूग्ण रूग्ण, 58 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात 3276 नवे कोरोना रूग्ण दिवसभरात पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज दिवसभरात 3723 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज 58 मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 60 हजार 735 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.24 टक्के झाला आहे. आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात 3276 नवे कोरोना रूग्ण दिवसभरात पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज दिवसभरात 3723 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज 58 मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 60 हजार 735 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.24 टक्के झाला आहे.
आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 79 लाख 92 हजार 10 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 41 हजार 119 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात 2 लाख 59 हजार 120 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1483 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज घडीला राज्यात 37 हजार 984 सक्रिय रूग्ण आहेत.
मुंबईत 454 नवे रूग्ण
मुंबईत 454 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर मुंबईत आज दिवसभरात 580 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 17 हजार 521 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका नोंदवला गेला आहे. तर मुंबईत आज घडीला 4676 सक्रिय रूग्ण आहेत.