एक मुंबईकर जो Home Isolation मधल्या 200 कोरोना रूग्णांना रोज पुरवतो दोनवेळचं जेवण

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या एक माणूस अवघ्या एका फोन कॉलवर आयसोलेशनमध्ये असलेल्या कोव्हिड रूग्णांना जेवण पुरवण्याचं काम करतो आहे. दिवसातून दोन्हीवेळा जेवण पुरवलं जातं आहे. या अन्नदात्याचं नाव आहे राजीव सिंघल. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राजीव सिंघल यांना कोरोना झाला. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनाच कोरोनाने ग्रासलं. राजीव सिंघल हे जेव्हा क्वारंटाईन होते तेव्हा त्यांना दोनवेळचं जेवण व्यवस्थित मिळत नव्हतं. घरगुती जेवण त्यांना क्वारंटाईनच्या काळात मिळणं दुरापास्त झालं होतं. मात्र ते कोरोनातून बाहेर आले. त्यांनी मनाशी एक निग्रह केला की जे रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांना जेवण पुरवायचं.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्यावसायिक राजीव सिंघल आता हेच काम करत आहेत. दुसऱ्या लाटेत अनेक लोकांना होम क्वारंटाईन होऊन कोरोनाशी लढा द्यावा लागतो आहे. यामधले बहुतांश लोक घरात एकटे असतात. त्यांना घरगुती जेवण मिळणं कठीण असतं म्हणून त्यांना घरगुती जेवण पुरवण्याचं काम राजीव सिंघल करत आहेत. जी गोष्ट आपण सहन केली ती इतर कुणाला जेवणाच्या बाबतीत तरी किमान सहन करावी लागू नये ही त्यांची यामागे असलेली भावना आहे. त्यामुळेच ते आता 200 घरी दोनवेळचा जेवणाचा डबा पुरवत आहेत.

काय म्हटलं आहे सिंघल यांनी?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सगळ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्या काळात घरी तयार केलेलं सकस जेवण आम्हाला मिळू शकलं नाही. सध्याच्या घडीला राज्यात आणि देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अशा वेळी अनेक लोक घरी राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यामुळे मी लोकांना जेवण पुरवण्याचा निर्णय मी घेतला याबद्दल मी सोशल मीडिया आणि What’s App वर कळवलं. जेव्हा मला फोन येतो तेव्हा तुमचा कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मी मागत नाही. मी संबंधित रूग्णाशी बोलतो त्याची अडचण समजून घेतो आणि त्याला जेवणाचा डबा पुरवतो. आशा भारतीय या जेवणाचे घरगुती डबे पुरवतात त्यांना मी ही माहिती पुरवतो आणि त्यांच्या मदतीने हे जेवणाचे डबे पुरवतो’ असंही सिंघल यांनी सांगितलं.

आशा भारतीय या मुंबईतल्या मालाडमध्ये वन बीएचके फ्लॅटमध्ये त्यांचं पोळीभाजी केंद्र चालवतात. या कामात त्यांना त्यांच्या मुलांची आणि नवऱ्याचीही मदत होते. हे सगळे मिळून 200 जणांसाठी स्वयंपाक तयार करतात आणि त्यासाठी ते रोज पहाटे 4 ला उठून तयारीला लागतात. तसंच रात्रीचे 10 वाजेपर्यंत त्यांचं काम थांबत नाही. आम्ही पुरवत असलेल्या जेवणात दोन भाज्या, वरण-भात, पोळी, पापड, दही आणि लोणचं असतं. डिस्पोजेबल बॉक्समध्ये हे जेवण भरून आम्ही ते 200 कोव्हिड रूग्णांना सकाळी आणि संध्याकाळी पुरवतो. कुणाचाही स्पर्श होणार नाही याचीही काळजी घेतो.. तसंच सोशल डिस्टन्सिंगही आम्ही पाळतो असंही भारतीय आणि सिंघल यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

राजीव सिंघल हे माहिम ते मीरा रोड या भागांमध्ये जेवणाचे डबे पुरवतात. एवढंच नाही तर कोव्हिड रूग्णांसाठी आणखीही काही करता आलं तर करण्याचा माझा मानस आहे असंही राजीव सिंघल यांनी मुंबईतकला सांगितलं. तसंच मी अनेक लोकांना हे आवाहन करतो की त्यांनीही पुढाकार घ्यावा आणि घरी असलेल्या कोव्हिड रूग्णांना जेवण पुरवण्यासाठी मदत करावी असंही सिंघल यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT