Mansukh Hiren Case:सचिन वाझेंचा कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज
ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी आरोप झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. दहशतवाद विरोधी पथक अर्थात ATS नेही सचिन वाझे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुढील कारवाईची शक्यता लक्षात घेऊन सचिन वाझे यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाच्या बाहेर एक […]
ADVERTISEMENT

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी आरोप झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. दहशतवाद विरोधी पथक अर्थात ATS नेही सचिन वाझे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुढील कारवाईची शक्यता लक्षात घेऊन सचिन वाझे यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाच्या बाहेर एक स्कॉर्पिओ २६ फेब्रुवारीला आढळली होती. या स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन यांची आणि सचिन वाझे यांची ओळख होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळला. त्यानंतर या प्रकरणात सचिन वाझेंवर गंभीर आरोप झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सचिन वाझे यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे.
सचिन वाझे अडकणार? पाहा काय आहे आतापर्यंतचा घटनाक्रम
Maharashtra: Mumbai police officer Sachin Vaze has moved an anticipatory bail application in District & Sessions Court, Thane. The court has kept the matter for hearing on 19th March.
— ANI (@ANI) March 12, 2021
काय आहे प्रकरण?