नांदेड: कार आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात दोन पोलीस जागीच ठार

मुंबई तक

नांदेड: नांदेडमध्ये कार आणि उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त कारमध्ये एकूण चार पोलीस होते. त्यापैकी 2 पोलीस कर्मचारी हे जागीच ठार झाले तर 2 पोलीस कर्मचारी हे गंभीर जखमी झाले आहेत. भोकर-नांदेड महामार्गावरील खरबी गावाजवळ काल (9 जानेवारी) रात्री उशिरा हा अपघात झाला. ही टक्कर इतकी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नांदेड: नांदेडमध्ये कार आणि उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त कारमध्ये एकूण चार पोलीस होते. त्यापैकी 2 पोलीस कर्मचारी हे जागीच ठार झाले तर 2 पोलीस कर्मचारी हे गंभीर जखमी झाले आहेत.

भोकर-नांदेड महामार्गावरील खरबी गावाजवळ काल (9 जानेवारी) रात्री उशिरा हा अपघात झाला. ही टक्कर इतकी भीषण होती की, कारमध्ये बसलेल्या दोन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. दीपक देवानंद जाधव आणि ईश्वर सुदाम राठोड अशी मृत पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर अपेक्षा इटग्याळकर आणि सदानंद सपकाळ हे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहेत.

गंभीर जखमी अवस्थेतील दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना महामार्ग पोलिसांनी तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. हे चारही पोलीस भोकर येथे मित्राच्या घरी जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा नांदेडच्या दिशेने परत येत असताना खरबी गावाजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक बसली.

या अपघातातील जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp