आशिफ खान-समीर वानखेडे यांच्यात कोणते संबंध आहेत? ; मलिकांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’ केले शेअर

मुंबई तक

कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी विविध शंका आणि प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी मंगळवारी पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅप चॅट काही स्क्रीनशॉट शेअर करत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. एनसीबीने कारवाई केलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवाब मलिक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी विविध शंका आणि प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी मंगळवारी पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅप चॅट काही स्क्रीनशॉट शेअर करत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे.

एनसीबीने कारवाई केलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवाब मलिक हे सुरुवातीपासूनच समीर वानखेडे यांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करताना दिसत आहे. समीर वानखेडे हे त्यांच्या खाजगी लोकांच्या मदतीने बनावट कारवाया करत असल्याचंही मलिक यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आज (16 नोव्हेंबर) नवाब मलिक यांनी काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट सार्वजनिक करत खळबळ उडवून दिली.

नवाब मलिक Vs समीर वानखेडे: काय आहेत आरोप-प्रत्यारोप? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!

ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार आणि सध्या येरवडा तुरुंगात असलेल्या किरण गोसावी आणि खबऱ्यामधील व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रीनशॉट ट्वीट केले आहेत. ज्यात खबरी आणि गोसावी एकमेकांशी व्यक्तींच्या ओळखीबद्दल बोलताना दिसत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp